अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

rape_case
rape_case

टेकाडी - गोंडेगाव परिसरातील एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० वर्षीय नराधमाकडून अतिप्रसंग केल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) घडली. रात्री उशिरा आरोपीला गाडेघाट येथून अटक करण्यात आली. शनिवारी अतिरिक्‍त पोलिस अधिकारी मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.आरोपी आतिश यादव (वय ३०) नराधमाने एका ११ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अमानवीय अत्याचार केला. पीडितेच्या घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपी पीडितेच्या घरी दुपारी एकच्या सुमारास आला आणि पीडितेचे तोंड दाबून निर्जनस्थळी नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत सोडून आरोपी निघून गेला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी घटनास्थळ गाठून मुलीचा शोध घेतला. झुडपांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत आढळली. तत्काळ तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध घेऊन त्याला गाडेघाट येथून ताब्यात घेतले.

सोशल मीडियावरील पीडितेचा फोटो वायरल होतोय. तो मुळात तिचा नाहीच. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोपी आमच्या ताब्यात असून त्याला कठोरच शिक्षा होईल. पीडितेची भेट घेतली. ती सध्या ‘स्टेबल’ असून परिस्थिती आटोक्‍यात आहे. सोशल मीडियावर फोटो वायरल करताना विचार करावा.
- मोनिका राऊत, अतिरिक्‍त पोलिस अधिकारी

सोशल मीडियावर फोटो व्हायरल
शनिवारच्या सकाळी अतिरिक्‍त पोलिस अधिकारी मोनिका राऊत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोषीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्यांना समजाविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारपासून सोशल मीडियावर पीडित मुलीचा फोटो वायरल होत आहे. डीवायएसपी कातकडे यांनी वायरल करणाऱ्यांचा कसून शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com