
अमरावती : भावा-भावात, भावा-बहिणींमध्ये खूप प्रेम असते असे म्हणतता. ते खरंही आहे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत ते एकमेकांची काळजी घेत असतात. एकमेकांच्या सुखा-दुखात सहभागी होतात. बाहेरील व्यक्तीने एकासोबत वाद घातला तर दुसरा धाऊन जातो. आपल्या भावाला वाचविण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. मात्र, एक दिवस असा येतो की भाऊच भावाच्या जीवावर उठतो. असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळाला...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या नावावर असलेली तीन एक शेती आपल्या नावावर करण्यासाठी मागणी दोन वर्षांपासून तीन भावांमध्ये संघर्ष सुरू होता. यासाठी तिन्ही भावांमध्ये नेहमीच भांडण होत होते. तसेच आईसोबतही त्यांनी अनेकदा वाद घातला होता. सतत भांडण वाढत असल्याने एका भावाने चक्क आईलाच ठार मारण्याची धमकी दिली होती.
अशोक पुंडलिक वानखडे, मिलिंद पुंडलिक वानखडे व ज्ञानेश्वर पुंडलिक वानखडे अशी तीन भावांची नावे आहेत. त्याचा आईच्या नावावर असलेल्या शेतीवर ताबा मिळविण्यासाठी वाद सुरू होता. ज्ञानेश्वरने शेतीसाठी दोन्ही भावांवर चाकूने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर हा सद्य:स्थितीत संजीवन कॉलनी, बडनेरा येथे राहतो.
रविवारी ज्ञानेश्वर शेलुगुंड गावात आला. रात्रीच्या सुमारास सर्वच जण गाढ झोपेत होते. त्याने एका खोलीत झोपेत असलेल्या अशोक यांच्यावर आधी चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मध्यस्थीसाठी आलेल्या मिलिंद यालाही मारहाण करून जखमी केले. रात्री बोंबाबोंब झाल्याने ज्ञानेश्वरने घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारपर्यंत त्याला अटक झाली नव्हती.
आईच्या नावे असलेली तीन ऐकर शेती आपल्या नावाने करून द्यावी, या मागणीसाठी चिडलेल्या मोठ्या भावाने आपल्याच लहान भावांवर चाकूने प्रहार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती बहीण मुक्ता सतीश किर्दक (वय 25, रा. कामरगाव) हिने पोलिसांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.