सासू-सासऱ्याला मारण्याचा प्रयत्न

file photo
file photo

नागपूर : पत्रकार महिलेने तिला झालेल्या मानसिक त्रासाचा बदला घेण्यासाठी पती, सासू-सासरे, दीर व जाऊला ठार मारण्यासाठी एका मांत्रिकाला सुपारी दिली. घरात मंतरलेले लिंबू फेकताना नागरिकांनी मांत्रिकाला पकडले. त्याला चोप दिल्यानंतर खळबळजनक खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी महिला व मित्रांकाविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मांत्रिकाला अटक केली आहे. दिलीप चंदनलाल जैस्वाल (54, रा. बाबादीपसिंगनगर) असे मांत्रिकाचे तर किरण जैस्वाल (वय 36) असे महिला पत्रकाराचे नाव आहे. दिलीप याची सोमवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शामा कनोजिया (39, रा. नेताजी सोसायटी, साईनगर, झिंगाबाई टाकळी) हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत लिपिक आहेत. साईनगरमध्ये त्यांचे प्रशस्त घर आहे. येथे ते वडील शामा, आई पुष्पा, भाऊ विनित, विनय व विनयची पत्नी शीतल यांच्यासोबत राहतात. 2013 मध्ये सचिन यांचे किरणसोबत लग्न झाले. लग्नानंतर सचिन यांना किरणवर संशय यायला लागला. त्यामुळे दोघांत वाद झाला. 2014 मध्ये सासू पुष्पा व दीर विनय या दोघांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार किरणने गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सचिन यांनी घरात व बाहेर सीसीटीव्ही लावले. 16 मे रोजी काळ्या रंगाच्या कपड्याच्या बाहुलीला हळदीकूंकू लावून कोणीतरी घरात फेकली. सचिन यांना ती बाहुली दिसली. त्यानंतर 26 मे रोजी त्यांच्या घरात हळदीकूंकू लावलेले लिंबू फेकण्यात आले. लिंबूत खिळा खुपसलेला होता. त्यावर पुष्पा मृत्यू असे लिहिले होते. त्यानंतर 30 मे रोजी असाच प्रकार घडला.
सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग
सचिन यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. गळ्यात पिशवी लटकविलेला एक व्यक्‍ती हे सर्व करीत असल्याचे त्यांना दिसले. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सचिन व त्यांचे नातेवाईक सीसीटीव्ही बघत होते. याचदरम्यान दिलीप हा काहीतरी फेकताना सचिन यांना दिसला. आरडाओरड केल्यामुळे नागरिकांनी दिलीप याला पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये लिंबू, जादूटोण्याचे साहित्य व छायाचित्रे आढळली. पोलिसांनी त्याला अटक केली.
बदला घेण्यासाठी रचला कट
पतीपासून वेगळी राहत असलेल्या किरणने सचिन व त्याच्या कुटुंबाचा सत्यनाश करण्याचे ठरविले. यासाठी मित्र असलेला मांत्रिक दिलीप जयस्वाल याची मदत घेतली. दिलीपने सचिन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती काढली. घरासह सचिन यांची व्हिडिओ रेकॉर्डिंगही केली. ही रेकॉर्डिंग त्याने व्हॉट्‌सऍपने किरणला पाठविली. ज्यांचा खून करायचा आहे, त्यांचे फोटोही मोबाईलमध्ये आढळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com