महिलेसह बालिकेला नक्षल चळवळीत सामिल करण्याचा प्रयत्न 

मनोहर बोरकर
सोमवार, 25 जून 2018

एटापल्ली (गडचिरोली) : येथील एक बावीस वर्षीय महिला व चौदा वर्षाच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना नक्षल चळवळीत सामील करण्याच्या प्रयत्न होता. या प्रकरणी रूपी लालू नरोटी (वय 32 वर्ष व दिनेश पुंगाटी दोघेही राहणार लाहेरी तालुका भामरागड) यांचेवर गुन्हा दाखल करून रुपी हीला अटक करण्यात आली आहे.

पीडीत महिला ही विवाहित असुन तिला दिड वर्षाचा मुलगा आहे. बालिका अशिक्षित असून ह्या दोहीही (ता 23) शनिवारला दुपारी दोन च्या दरम्यान शेतशिवारात काही काम करीत होत्या. आरोपी रूपी नरोटी हिने त्यांना तिथे गाठून नक्षल चळवळीत सामील होण्यासाठी त्यांचे अपहरण केले. नरोटी हिने दोघींनाही आलापल्ली मार्गे लाहेरी तालूका भामरागड येथील दिनेश पुंगाटी याचे घरी ओलिस ठेवले. व परत (ता 24) रविवारी एटापल्लीला पीडीत महिलेच्या घरी आली. ती मि नव्हेच अशा बहान्याने आणखी एका बारा वर्षीय मुलीस नक्षल चळवळीत सामील करण्याच्या प्रयत्न करुण पीडित महिला कुठे गेली असे विचारणा करू लागली. यावेळी नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
सुरुवातीला मला काहीच माहिती नाही. अशी बतावनी करणारी रूपी नरोटीने पोलिसांनी खाक्या दाखवताच सगळी हकिकत सांगितली. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून पीडीत महिला व बालिकेला लाहेरी पोलिसांनी दिनेश पुंगाटीच्या घरून ताब्यात घेतले व रूपी नरोटी व दिनेश पुंगाटी यांचेवर गुन्हे दाखल करुण अटक करण्यात आले आहे. 

सदर प्रकरणी जिल्ह्यात नक्षल चळवळीत युवक व युवातींना सामील करणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता असून पोलिस तपासात आरोपींची संख्या वाढन्याची शक्यता आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.

Web Title: Attempts to involve the girl in Naxal movement with the woman

टॅग्स