cover.png
cover.png

मामीने नेला भाचा पळवून !

अकोला : आपण अनेकदा मैत्र-मैत्रिणी, आंतरजातीय युवक युवती पळून जाण्याच्या घटना ऐकत असतो मात्र, आपल्या वयापेक्षा 12 वर्षाने लहान असलेल्या भाच्यासोबत मामी पळून गेल्याची घटना खदानच्या हद्दीत घडली आहे. हा सर्व प्रकार लपवणे शक्य नसल्याने नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठले होते. या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मामी आणि भाच्याचे संबंध असल्याची कुणकुण नातेवाईकांत होती. यापूर्वी एकदा असाच प्रकार उघडकीस आला होता. मात्र पुन्हा एकदा भाचा स्वत:च्या मामीलाच घेवून पळून गेला आहे. नातेवाईकांनी या दोघांचाही शोध घेतला मात्र त्यांचा थांगपत्ता नाही. आता हे दोघे सापडतच नाही म्हणून हैराण झालेल्या नातेवाईकांनी त्यात युवताची आई, त्याचा मामा व आजी या सर्वांनी मिळून पोलिसांची पायरी चढली आहे. विशेष म्हणजे पळून गेलेल्या मामीला 12 व 13 वर्षाची दोन मुले आहेत. कसलाच विचार न करता या दोघांनी संसार थाटण्याचा घेतलेला निर्णय मात्र नातेसंबंधाला काळीमा फासणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com