esakal | ऑटोरिक्क्षा चालकाची करामत! प्रवाशाकडून एटीएमकार्ड हिसकावून काढले ८४ हजार
sakal

बोलून बातमी शोधा

ATM center

श्रीराव हे बियाणी चौकातून १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी एका प्रवासी ऑटोत बसले. तेथून पुढील चौकात थांबून त्यांनी एटीएममधून पाचशे रुपये काढले. त्याच ऑटोत पुन्हा बसून ते बारमध्ये आले. येथे ऑटोचालकाने जवळचे एटीएमकार्ड हिसकावून पीनकोड प्राप्त केला होता.

ऑटोरिक्क्षा चालकाची करामत! प्रवाशाकडून एटीएमकार्ड हिसकावून काढले ८४ हजार

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः ऑटोचालकाने प्रवाशास बारमध्ये नेले. तेथे काहीतरी खायला घालून बेशुद्ध केले. त्यापूर्वीच सदर व्यक्तीचे एटीएमकार्ड हिसकावून कोडनंबर प्राप्त केला. त्याचा उपयोग करून ऑटोचालकाने ८४ हजारांची रोख रक्कम वेगवेगळ्या एटीएममधून काढल्याची घटना शहरात उजेडात आली. प्रवीण श्रीराव (रा. विलासनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. २४) ऑटोचालकाविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. 

श्रीराव हे बियाणी चौकातून १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी एका प्रवासी ऑटोत बसले. तेथून पुढील चौकात थांबून त्यांनी एटीएममधून पाचशे रुपये काढले. त्याच ऑटोत पुन्हा बसून ते बारमध्ये आले. येथे ऑटोचालकाने जवळचे एटीएमकार्ड हिसकावून पीनकोड प्राप्त केला होता. येथे पापडी खायला घातल्याने प्रवीण श्रीराव बेशुद्ध झाले. त्यानंतर काय झाले हे त्यांनाही कळले नाही. ऑटोचालकाने त्याच एटीएमकार्ड व पीनकोडचा गैरवापर करून शहरातील विविध एटीएम सेंटरवरून टप्प्याटप्याने ८४ हजार रुपये काढले व एटीएमकार्ड श्रीराव यांना परतही दिले. 

अमरावतीत खाल्ला डोसा अन् आळंदीत लग्न! 
 

१७ ते २० सप्टेंबरपर्यंत ते उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी त्यांना आपल्या खात्यातील रक्कम कुणीतरी हडपल्याचे लक्षात आले. त्यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अखेर गुरुवारी (ता. २४) अनोळखी ऑटोचालकाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

`रब ने बनाई जोडी`ची फेसबूकवर धूम! कपल चॅलेज होतेय व्हायरल 
 

ज्या एटीएम सेंटरमधून ऑटोचालकाने पैसे काढले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीकरिता ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. लवकरच त्या ऑटोचालकास अटक केली जाईल.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर