Video यवतमाळच्या रॅन्चोने बनविला स्वयंचलित हॅन्ड आणि फूट वॉशर

Automatic hand and foot sanitizer machine developed by Rajesh Sharma
Automatic hand and foot sanitizer machine developed by Rajesh Sharma

यवतमाळ : "गरज शोधाची जननी असते', असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हात व पाय वारंवार स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दुकाने व कार्यालयांमध्ये त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. ही गरज लक्षात घेऊन येथील एका रॅन्चोने घरी पडून असलेल्या वस्तूंपासून ऑटोमॅटिक हॅंड व फूट सॅनिटायझर मशीन तयार केली. या मशीनचा वापर आपण कार्यालये, दुकाने व घरीसुद्धा करू शकतो.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने साबण व पाण्याने 20 सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुणे, हात सॅनिटाइज करणे गरजेचे असल्याचे सुचविले. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी, कार्यालये, दुकाने व घरातही हात व पाय स्वच्छ करण्याला प्राथमिकता दिली जात आहे. दुकानात, कार्यालयात तर हात सॅनिटाइज करण्यासाठी एक माणूस ठेवण्याची गरज आहे.
 

ही बाब फार त्रासदायक असल्याने येथील चष्म्यांचे व्यावसायिक राजेश शर्मा यांनी ऑटोमॅटिक हॅंड व फूट सॅनिटायझर मशीन बनविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी घरीच पडून असलेल्या वस्तूंचा वापर केला. त्यात मायक्रो कंट्रोलवर व अल्ट्रासॉनिक सेंसरचा वापर केला. त्यात सॅनिटायझर टाकले की हात निर्जंतुक करण्याची व्यवस्था झाली. अगदी पाच सहा हजार रुपयांत हे यंत्र त्यांनी तयार केले.

या यंत्राखाली हात, पाय ठेवले की, त्यातून आपोआप सॅनिटायझर सोडले जाते. त्यामुळे हात व पाय आपोआपच निर्जंतुक होतात. त्यासाठी कुण्या माणसाची गरज पडत नाही. कमी जागेत हे यंत्र ठेवता येते. मात्र हे यंत्र विक्रीसाठी उपलब्ध नसल्याची माहितीही शर्मा यांनी दिली.


सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये, दुकाने व घरांतदेखील या यंत्राचा वापर करणे सोपे आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या हात व पायांचे निर्जंतुकीकरण करता येते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे यंत्र उपयोगी ठरू शकते.
राजेश शर्मा, चष्मा व्यावसायिक, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com