"अवनी'चा मादी बछडा जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

राळेगाव/वडकी (जि. यवतमाळ) : टी-वन वाघीण अर्थात अवनीला मारल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली होती. त्यात वनविभागाच्या पथकाला शनिवारी (ता. 22) दुपारी यश आले. हत्तीवर बसून पशुचिकित्सकाने मादी बछड्यावर डॉट मारला. त्यानंतर ही मोहीम अंजी परिसरात फत्ते झाली.

अवनीच्या बछड्यांचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशातून चार हत्ती याच आठवड्यात आणले होते. बछडे कॅमेऱ्यात ट्रॅप होत होते. मात्र, पथकाच्या हाती लागत नव्हते. बुधवार (ता. 19) पासून अंजी परिसरात मोहीम अधिकच तीव्र करण्यात आली होती. कान्हा अभयारण्यातील शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय हे चार हत्ती सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पथके या मोहिमेत सहभागी झाले होते.
अवनीने राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्‍यातील 13 शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतला. अवनीला दोन ऑक्‍टोबरला बोराटी शिवारात ठार करण्यात आले होते. मात्र, तिचे दोन बछडे शिकारी योग्य झाल्याने व्याघ्रग्रस्त नागरिक भयभीत होते. अंजी परिसरात अवनीच्या एका बछड्याला जेरबंद करण्यात आले. तत्काळ वनविभागाच्या वाहनाने पेंच अभयारण्यात हलविण्यात आले. लवकरच दुसऱ्या बछड्याला जेरबंद करण्यात येणार असल्याचा विश्‍वास वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हिरवी जाळी लावली होती
बछड्यांना जेरबंद करण्यासाठी जंगल परिसरात हिरवी जाळी लावण्यात आली होती. जेरबंद करताना त्या बछड्याला सामोरचे काही दिसू नये, अशी खबरदारी घेण्यात आली होती.

Web Title: "Avni'a's female calf martyr