डॉ. सदानंद देशमुख यांच्या तहान एकांकिकेस तब्बल ऐवढे पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम तहान आली असून, याबरोबरच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विजय पाटील यांना तर तहान मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून बबन शेवाळे यांची भूमिका करणाऱ्या प्रतीक वारणे यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.

बुलडाणा : प्रसिद्ध लेखक डॉ. सदानंद देशमुख यांच्या तहान कादंबरीवर आधारित एकांकिकेस नऊ पुरस्कार प्राप्त झाले आहे. ठाणे येथील दिग्दर्शक आणि कलावंत विजय पाटील यांनी आपल्या कलामंथन या नाट्यसंस्थेव्दारा तहान एकांकिकेचे विविध स्पर्धांमधून सादरीकरण केले आहे.

कामगार कल्याण केंद्र मुंबई महानगरपालिका एकांकिका स्पर्धा अंतिम फेरी मुलूंड हरळीकरण केंद्र प्रस्तुत एकांकिका स्पर्धा 11 मार्चला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह मुंबई येथे पार पडली. या स्पर्धेत तहान या एकांकिकेस एकूण 9 पारितोषिक प्राप्त झाली आहे. सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम तहान आली असून, याबरोबरच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विजय पाटील यांना तर तहान मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून बबन शेवाळे यांची भूमिका करणाऱ्या प्रतीक वारणे यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

महत्त्वाची बातमी - अल्पवयीन प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

तहान एकांकिकेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रेरणा मिसळ, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना व्दितीय विजय गोळे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम कल्पेश पाटील आणि समूह, सर्वोत्कृष्ट संगीत व्दितीय शुभम राणे, सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ विशाल भालेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ दीपक जोईल, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ श्‍वेता ठाकूर असे एकूण नऊ प्रकारातील पारितोषिक स्पर्धेत ही एकांकिका सादर केल्यानंतर प्राप्त झाले आहे. यापूर्वी तहान कादंबरीचा अमरावती, पुणे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर विद्यापीठातून अभ्यासक्रमात समावेश झाला असून, या कादंबरीचा हिंदी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे. त्याचप्रमाणे लवकरच या कादंबरीवर मराठी चित्रपटाची निर्मिती होत आहे. तहानच्या यशाबद्दल डॉ. गणेश गायकवाड, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. गोविंद गायकी, नरेंद्र लांजेवार यांनी डॉ. सदानंद देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: award for Dr. Sadanand Deshmukh's tahan