आयुर्वेदाच्या गतवैभवासाठी सन्मान गरजेचा - डॉ. मोहन भागवत

नागपूर - सांडू कंपनीच्या शतकोत्तर वाटचालीच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक  डॉ. मोहन भागवत, श्रीपाद नाईक, प्रमोद सावंत, उमेश सांडू व शशांक सांडू.
नागपूर - सांडू कंपनीच्या शतकोत्तर वाटचालीच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, श्रीपाद नाईक, प्रमोद सावंत, उमेश सांडू व शशांक सांडू.

नागपूर - गतवैभव परत मिळविण्यासाठी आयुर्वेदाचा सन्मान गरजेचा आहे. ॲलोपॅथी शरीरशास्त्राचा विचार करते. मात्र, आयुर्वेद मन, शरीर, बुद्धी व आत्माच्या विचार करते. आयुर्वेदाची मानप्रतिष्ठा वाढवणारी ताकद निर्माण झाली तर आयुर्वेदाला गतवैभव प्राप्त होईल, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.

आयुर्वेदशास्त्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आयुर्वेदाचार्यांचा रविवारी सांडू ब्रदर्सतर्फे सन्मान करण्यात आला. मंचावर आयुष केंद्रीय मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत, उमेश सांडू आणि शशांक सांडू होते. जग भारतीय आयुर्वेदाच्या शोधात आहे. आयुर्वेदावर श्रद्धा व भक्‍ती ठेवणारे ज्ञानी कौशल्यशील पिढी तयार होणे गरजेचे आहे. प्रत्येक सामान्य वैद्याच्या तपस्येने आयुर्वेदचा गौरव वाढणार आहे. पाश्‍चिमात्य लोकांना जीवनशैलीत बदल हवे असल्याने ते आयुर्वेद स्वीकारत असले तरी भारतात जनजागृती आवश्‍यक असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले.

भारतात आतापर्यंत आयुर्वेदिक चिकित्स पद्धतीचा पर्यायी उपयोग व्हायचा. आता लोक ही पॅथी स्वीकारत आहे. आयुष मंत्रालयाच्या चतु:सूत्री कार्यक्रमाअंतर्गत आयुर्वेद जगात पोहोचविला जात आहे. संशोधन, प्रचार, प्रसार आणि सेवा या विषयांवर ५८ देशांत आयुर्वेद माहिती केंद्रे काम करीत आहेत. देशात एम्सच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयात दिवसाला दोन हजार रुग्ण उपचार घेतात. 
गोव्यात व पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू होते आहे. चार वर्षांत ६०० महाविद्यालयांमधून सात लाख वैद्य उत्तीर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले. संचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले. शशांक सांडू यांनी आभार मानले.

सांडू पुरस्काराने गौरव
कार्यक्रमात वैद्य मदन कारपे यांना आयुर्वेदातील योगदानासाठी सुश्रृत पुरस्काराने, प्रा. सुभाष  रानडे व प्रा. शंकर किंजवडेकर यांना सांडू गौरव पुरस्काराने तर वैद्य सतीश भट्टड, वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य शंकर त्रिपाठी, वैद्य महेंद्र शर्मा, वैद्य उपेंद्र दीक्षित यांना सांडू भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

बहुभाषिकांची गरज
आयुर्वेद विविध भाषेत सांगणाऱ्यांची देशाला गरज आहे. वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधन पत्रिका प्रसिद्ध करा, असे आवाहन डॉ. मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांना  केले. कारण, या संशोधन पत्रिकाच आयुर्वेदाचा ‘रेकॉर्ड’ ठरतील असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com