
अचलपूर : महाराष्ट्रभर गणेशभक्तांचा उत्साह, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि मंडपात रंगणारे देखावे, हे दृश्य दरवर्षीचेच. पण यावर्षीच्या पारंपरिक गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीचा नवा चेहरा मिळाला आहे. माजी आमदार बच्चू कडू यांनी यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसाठीच, असे भावनिक आवाहन केले आहे.