विधानसभेला मोठ्या पक्षासोबत जाण्याची बच्चू कडू यांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय उलथापालथी होतायेत. त्याच प्राश्वभूमीवर प्रहारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी पाच आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी ज्या लोकांना आमचे विचार पटत असतील त्यांच्यासोबत जायला तयार असल्याचं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय उलथापालथी होतायेत. त्याच प्राश्वभूमीवर प्रहारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी पाच आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी ज्या लोकांना आमचे विचार पटत असतील त्यांच्यासोबत जायला तयार असल्याचं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

बच्चू कडू यांनी एकला चलो रे ची भूमिका सोडून कोणत्याही एका मोठ्या राजकीय पक्षासोबत जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी आपले राजकीय पत्ते उघड केले नसले तरी आगामी निवडणुकीत कोणासोबत जाणार हे येत्या काळात स्पष्ट करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bacchu kadu ready to Allaince with big party for Assembly Election