Bacchu Kadu hits back at critics over farmers protest
Esakal
मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यावरून आता त्यांना लक्ष्य केलं जातं आहे. बच्चू कडू मॅनेज झाले, त्यांना फसवलं अशी टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. मात्र, या टीकेवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज अमरावतीत पत्रकार परिषद घेत त्यांनी टीकाकारांना चांगलं प्रत्युत्तर दिलं.