Bachchu Kadu
esakal
बबलू जाधव
यवतमाळ : दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसाठी सरकारकडून दिली जाणारी पाच हजार रुपयांची मदत पुरेशी आहे का, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. ‘आजच्या महागाईत पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? एवढ्या पैशांत कुटुंबाचा सण तरी कसा साजरा होणार?’ असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या मदतीवर नाराजी व्यक्त केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीसाठी किमान १० ते १५ हजार रुपये द्यावेत, तसेच दुष्काळी अनुदान म्हणून प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. ते आर्णी येथे बोलत होते.