esakal | #NagpurWinterSession : बच्चू कडू म्हणाले, सरकाने तरी शेतकऱ्यांना मदत करावी 
sakal

बोलून बातमी शोधा

Bachchu kadu said this government should help the farmers at winter session nagpur

सत्तेत येण्याआधी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच सरकारने पुरणवणी मागण्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकाने केंद्र सरकारच्या जीवावर हे आश्‍वास दिले होते का? आता केंद्राकडे चेंडू टोलविण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका फडणवीसांनी मंगळवारी केली.

#NagpurWinterSession : बच्चू कडू म्हणाले, सरकाने तरी शेतकऱ्यांना मदत करावी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गत 70 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने शेतकऱ्यांना हवी तशी मदत केलेली नाही. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने तरी राज्यातील बळीराजाला मदत करावी, अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्यावरून रणकंदन झाले. भारतीय जनता पक्षाने सकाळपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात आणि सभागृहाबोर देखील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. विधान परिषदेत देखील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्यावर आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले. शेतकऱ्यांच्या मदतीवर केवळ राजकारण सुरू आहे. 

ठळक बातमी -  #NagpurWinterSession : आव्हाड म्हणाले, राज्याला भाजपची अपरिपक्वता दिसली

70 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने शेतकऱ्यांना हवी तशी मदत केलेली नाही. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने तरी राज्यातील बळीराजाला मदत करावी, अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. यासोबतच भाजप आमदारांनी केलेला धक्‍काबुक्कीचा प्रकार अशोभनीय आणि निंदणीय असल्याची प्रतिक्रिया आमदार कडू यांनी दिली. 

पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण तापले होते. दुसऱ्या दिवशी देखील अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी सकाळीच आक्रमक पवित्रा घेत विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सभागृहात देखील विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

सत्तेत येण्याआधी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच सरकारने पुरणवणी मागण्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकाने केंद्र सरकारच्या जीवावर हे आश्‍वास दिले होते का? आता केंद्राकडे चेंडू टोलविण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका फडणवीसांनी मंगळवारी केली. 

सविस्तर वाचा -  #NagpurWinterSession : सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला : फडणवीस

आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांना स्वत:च्या बळावर मदत केली होती. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात असमर्थ असल्याचे दिसत असून, त्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याचे फडणवीस म्हणाले. अशा सरकाने खुर्ची खाली करावी अशी मागणीही त्यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना केली. 

हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. विरोधी पक्षाच्या आमदारांनी परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आंदोलन केले. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली. 

loading image