मागासवर्ग प्रतिनिधी आरक्षण सोडत जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अमरावती : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार यावर्षी विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक घेण्यात येणार आहे. याकरिता सर्वप्रथम विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद व महाविद्यालय विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे. यामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि मागासवर्ग प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी निवडून येणार आहेत. मागासवर्ग प्रतिनिधी वर्गवारीत ओबीसी, एससी, एसटी, डीटी-व्हीजेएनटी अशा चार वर्गवारीत आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आले. त्यात विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेवरील मागासवर्ग प्रवर्गातील आरक्षण एसटी संवर्गाला निश्‍चित करण्यात आले आहे.

389 महाविद्यालयांचे मागासवर्ग प्रवर्गातील आरक्षण सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.rgbau.ab.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. याशिवाय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील मागासवर्ग प्रतिनिधीची आरक्षण सोडत काढण्यात आली, यामध्ये एसबीसी संवर्गात सोडतीद्वारे आरक्षण निश्‍चित करण्यात आले.
जवळपास पंचवीस वर्षांनंतर खुल्या पद्धतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना निश्‍चितच वाव मिळणार आहे. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरसुद्धा प्रतिनिधित्व मिळणार आहे. विद्यापीठांतर्गत 389 महाविद्यालयांपैकी अमरावती 121, अकोला 60, बुलडाणा 90, वाशीम 36 व यवतमाळ 82 अशी जिल्हावार महाविद्यालयांची संख्या आहे. मागासवर्ग प्रतिनिधींची सोडत आज, मंगळवारी काढण्यात आली. त्यामध्ये ओबीसी 148, एससी 101, एसटी 54 व डीटी-व्हीजेएनटी 86 याप्रमाणे महाविद्यालयांमध्ये आरक्षण असेल. संलग्नित महाविद्यालयांपैकी मागासवर्ग प्रतिनिधी कोणत्या आरक्षण वर्गवारीचा सोडतीद्वारे निश्‍चित आला, त्याची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठ शैक्षणिक विभागातील विद्यार्थिनींनी सोडती काढल्या.
याप्रसंगी डॉ. के. जी. देशमुख सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिनेश सातंगे, रासेयो प्रभारी संचालक डॉ. राजेश बुरंगे, डॉ. रवींद्र सरोदे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. दिनेश सातंगे यांनी, तर संचालन डॉ. रेखा मग्गीरवार यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Backward Class Representatives announce reservation draw