अकोल्यात सिग्नल तेथे खड्डा

विवेक मेतकर 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

अकोलाः एोकावं ते नवलंच, अशी म्हण आहे. या म्हणीनुसारच अकोल्यात पहावं ते नवलंच, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील प्रत्येक सिग्नलवर खड्डा आणि खड्ड्यातून गेल्याशिवाय तुम्हाला पर्यायच उरलेला नाही. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा सरसावल्या असल्या तरी शहरातील प्रत्येक चौकात पडलेल्या खड्ड्यांमधून झिगझॅग गाडी चालविण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

अकोलाः एोकावं ते नवलंच, अशी म्हण आहे. या म्हणीनुसारच अकोल्यात पहावं ते नवलंच, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील प्रत्येक सिग्नलवर खड्डा आणि खड्ड्यातून गेल्याशिवाय तुम्हाला पर्यायच उरलेला नाही. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा सरसावल्या असल्या तरी शहरातील प्रत्येक चौकात पडलेल्या खड्ड्यांमधून झिगझॅग गाडी चालविण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

शहरात एकीकडे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असल्याचा दावा केला जात आहे. या उलट परिस्थिती शहरत आहे. नजर जाईल तेथे खड्डा दिसत असल्याने शहर खड्ड्यात गेले असल्याचा प्रत्यय ‘सकाळ’च्या टिमने केलेल्या पाहणीतून आला. काही खड्डेतर सहा इंचापेक्षाही अधिक खोलीचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनधारकांना झिगझॅक पध्दतीने रस्त्यावरून जावे लागत आहे. मात्र, प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ?
खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मान आणि कंबरदुखीचा त्रास होतो. वाहन जोरात आदळल्यास ज्येष्ठ नागरिकांना मणक्यांचे फ्रॅक्चर होण्याची भिती असते. याशिवाय ‘स्लिप डिस्क’ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

काय होतं?
कमी जाडीच्या डांबर थरामुळे रस्त्यांना तत्काळ भेगा पडतात. तसेच त्यात पाणी शिरून खड्डे पडतात. त्यामुळे खड्ड्यांमध्ये खडी, डांबर भरून रोलरने दाबून डागडुजी केली जाते. त्यासाठी सरफेस कोरडा असावा लागतो. तसेच पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी इमल्शन डांबर वापरावे लागते.

वयोवृध्दांना असह्य वेदना
रस्त्यांवर चौका-चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे जिकरीचे झाले असून, अपघातांचे प्रमाण वाढू शकते. वयोवृध्द नागरिकांना या रस्त्यांमुळे असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत.
-दिनेश निचळ, नागरिक अकोला

चौक तेथे खड्डा
शहरातील टॉवर चौक, मदनलाल धिंग्रा चौक, अशोक वाटिका, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन्स चौक, रतनलाल प्लॉट, दूर्गा चौक, अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन चौक अशा प्रत्येक चौकात सिग्नलवर खड्डे पडलेले आहेत.

रस्ता खोदला, बुजवेल कोण?
शहरातील अशोक वाटिका चौकापासून ते धिंग्रा चौक, अग्रसेन चौक या मार्गाने जवळपास चार-सहा महिन्यांआधी जलवाहिनी टाकताना चौका-चौकात खोदलेल्या खड्ड्यांना बुजविण्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्नही वाहनधारक आता विचारू लागले आहेत.

Web Title: bad road conditions in akola