चेहऱ्यावरचा रुमाल काढ.. मला बोलायचे आहे..! पोलीस अधिकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग, निलंबनाची कारवाई

Akola Crime News : बाळापूर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसाने हे कृत्य केल्याने नागरीकांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे.
Crime news

Crime news 

Sakal
Updated on

बाळापूर : ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे, चेहऱ्यावरचा रुमाल काढ’ असे म्हणत तरुणीची दुचाकी अडवून तीला अश्लील हातवारे करुन छेड काढणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध बाळापूर पोलिस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी साडे चार वाजताच्या सुमारास व्याळा ते शेळद फाटा दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे अकोला पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. बाळापूर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसाने हे कृत्य केल्याने नागरीकांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. शंकर सुरेश बोंडे रा. (पिंपळगाव राजा) ता. खामगाव असे या आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेल्हारा येथील २७ वर्षीय तरुणी बाळापूर नगरपरिषदेत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करते. शुक्रवारी सायंकाळी काम आटोपून ती नेहमीप्रमाणे अकोलाकडे दुचाकीने निघाली. राष्ट्रीय महामार्गावरुन तीचा प्रवास सुरू असताना व्याळा ते शेळद दरम्यान आरोपी शंकर बोंडे याने तीची दुचाकी अडवली. त्यानंतर त्याने तीला तोंडाचा रुमाल सोड मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हटले. त्यानंतर त्याने अश्लील संवाद साधून तीला अश्लील हातवारे केले.

Crime news
Akola Crime News : दुसऱ्याशी सबंध असल्याचा संशय, तरुणाने समलैंगिक मित्राची केली हत्या; ३ वर्षांपासून होते एकत्र, अकोल्यात खळबळ

अचानक घडलेल्या प्रकारामुळे सदर तरुणी घाबरून गेली. तरुणीने तात्काळ डायल ११२ वर संपर्क केला. जुनेशहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनास्थळ हे बाळापूर पोलिस स्टेशन हद्दीत असल्याने बाळापूर पोलिसात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला सुरुवातीला अटक केली होती. नंतर समज पत्रावर सोडून देण्यात आले असे पोलिस निरिक्षक प्रकाश झोडगे यांनी सांगितले. पुढील तपास पीएसआय माधुरी पाटील करीत आहेत.

‘तो’ पिएसआय ड्युटीवर गैरहजर

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद मिरवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यानेच एका तरुणीला रस्त्याने गाठत तिचा विनयभंग केला. हा पोलिस उपनिरीक्षक रामदास पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. मात्र घटनेच्या दिवशी तो रामदास पेठ पोलिस ठाण्यात गैरहजर होता. तो बाळापूरकडे कशासाठी गेला होता याची याची माहिती मिळू शकली नाही. मात्र त्याने केलेल्या या कृत्यामुळे अकोला पोलिस दलाची मान शरमेने खाली झुकली आहे.

Crime news
Akola Crime: सखोल तपासानंतर एसीबीकडून रायटरला अटक; पोलिसांचे धाबे दणाणले, आकाेल्यातील लाचप्रकरणी धक्कादायक बाब समोर..

एकीकडे पोलीस प्रशासनाचा आकडा सांगतो की, अकोला जिल्हा गुन्हेगारांच्या विरुद्ध झाला असून एक नंबरवर आला आहे आणि दुसरीकडे मात्र पोलीस वर्धापन दिनाच्या दिवशीच खाकीतील व्यक्ती अशी कृत्य करतो. पोलिस अधीक्षक साहेबांनी याप्रकरणाची दखल घेवून दोषी पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com