‘स्टॅंड अप इंडिया’ला बॅंकांचा ‘नो रिस्पॉन्स’ - निश्‍चल शेळके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

नागपूर - केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्टॅंड अप इंडिया योजनेंतर्गत आतापर्यंत ७९ कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळाली. त्यातील ७५ नवउद्यमींना अंदाजे २३ कोटी ७५ लाखांचे कर्जवाटप केले. मात्र, अद्याप बॅंकांकडून सकारात्मक पावले उचलली जात नसल्याने ही योजना लालफीतशाहीत अडकल्याचा आरोप दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजचे पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष निश्‍चल शेळके यांनी केला. 

भारतीय लघुउद्योग विकास बॅंकेचे (सिडबी) वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रदीपकुमार नाथ यांनीही बॅंकांच्या असहकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. सिडबी आणि डिक्कीतर्फे बुधवारी ऊर्वेला कॉलनी बानाई हॉल येथे स्टॅंड अप इंडिया क्‍लिनिकच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नाथ म्हणाले, सिडबी स्टॅंड अप इंडिया योजनेवर संनियंत्रण करणारी संस्था आहे. स्टॅंड अप इंडियाचा प्रचार, प्रशिक्षणासाठी २५६ एजन्सींची निवड केली. यावेळी उपाध्यक्ष गोपाल वासनिक, विजय सोमकुंवर, राजेश दवंडे, मनोज दवे प्रियंका शेंडे आदी उपस्थित होते.

Web Title: bank no response to stand up india