esakal | सीमा सांभाळताय बॅरिकेट्स; बिनधास्तपणे मुक्तसंचार, या ठिकाणी आहे अशी स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

border barricades.jpeg

अकोला ते बुलडाणा मार्गावर केवळ बॅरिकेट्स उपलब्ध असून, काही व्यक्ती बिनधास्त थातूरमातूर परवानगी दाखवून मुक्तपणे संचार करत असल्याचे चित्र 7 एप्रिलला दिसून आले.

सीमा सांभाळताय बॅरिकेट्स; बिनधास्तपणे मुक्तसंचार, या ठिकाणी आहे अशी स्थिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने सर्वांतोपरी उपाययोजना करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला. यासाठी निर्धारित वेळेत दुकान, सोशल डिस्टनिंग आणि आपातकालीन व्यवस्थेसह जिल्हा सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. टप्याटप्याने बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे. परंतु, हा ताण केवळ जिल्हा प्रशासनच घेत असून, स्थानिक प्रशासन दुसऱ्याच कामात मश्‍गुल असल्याचे चित्र घाटाखाली दिसत असून, ज्या तालुक्यात कोरोना बाधित नाही, त्या तालुका बाधित झाल्यानंतर उपाययोजना करणार की, काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. सील सिमा असलेला मनसगाव नजीक अकोला ते बुलडाणा मार्गावर केवळ बॅरिकेट्स उपलब्ध असून, काही व्यक्ती बिनधास्त थातूरमातूर परवानगी दाखवून मुक्तपणे संचार करत असल्याचे चित्र 7 एप्रिलला दिसून आले.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये घाटावरील सर्वांत प्रथम बुलडाणा नंतर, खामगाव, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा आणि शेगाव तालुक्यात बाधित व्यक्ती आढळून आल्यामुळे प्रशासनाला तेथे क्लस्टर प्लॅन अ‍ॅक्टीव्हेट करावा लागला. अद्यापही घाटाखाली त्या प्रमाणात कोरोना बाधित नसून, यामधून जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर, मोताळा आणि घाटावरील मेहकर तालुका सुखरूप आहे. येथील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या कुठलाच प्रतिबंध करण्यात तर येतच नसल्याचे चित्र आहे. शिवाय सिमा भागही मुक्तपणे खूला आहे. 

हेही वाचा - अकोल्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या नऊवर

काही सिमा भागावर कर्मचारीच नसून, केवळ नाकाबंदीसाठी वापरण्यात येणार बॅरिकेट्स दिसून येत आहे. प्रामुख्याने जळगाव जामोद येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मर्जीतील काही व्यक्तींना मुक्तपणे संचार करण्याची सूट असल्याचे बोलल्या जात आहे. एकीकडे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत केवळ सकाळ आणि संध्याकाळ मोजक्याच भागातून फेरी करताना दिसून येत आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा तसेच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ सातत्याने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असून, उर्वरित तालुक्यात तरी बाधित कुणी आढळून नये यासाठी आरोग्य विभागासोबत उपाययोजना करत आहे. 

तर, स्थानिक महसूल प्रशासनासह पोलिस प्रशासन मात्र बाधित होण्याची वाट पाहण्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यातही बाधित सापडल्यामुळे चिंता वाढली असून, कोरोनाचा प्रभाव थांबविण्यासाठी सक्तीने अनावश्यक आणि थेट जिल्हा प्रशासनाची परवानगी असल्याशिवाय कुणालाही ये-जा करता सिमा क्षेत्र ओलांडण्याची परवानगी न देण्याची गरज निर्माण झाली आहे. 24 तास सिमा क्षेत्रावर खडा पहारा देण्याचीही गरज असून, याबाबत वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का असा सवाल आता निर्माण झाला आहे.

गृहरक्षक दलावर जबाबदारी
सीमा क्षेत्र परिसरात पोलिस प्रशासनाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती असणे गरजेचे असताना काही ठिकाणी केवळ गृहरक्षक दलातील जवानांवर ही जबाबदारी टाकण्यात आली असून, याला नागरिक जुमानत नसल्यामुळेही अडचण निर्माण झाली आहे.

बुलडाण्यासारखी व्यवस्था गरजेची
जिल्ह्यात बुलडाणा शहरात सर्वांत प्रथम कोरोना बाधित आढळल्यानंतर पोलिस प्रशासनाने सक्तीने पाऊल टाकत सर्वत्र नाकाबंदी केली. 24 तास कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली असून, विनाकारण संचार करणाऱ्या तसेच ओळखपत्र आणि परवानगी असल्याशिवाय फिरणाऱ्यावर चांगलाच जम बसला आहे. इतरही पोलिस स्टेशनअंतर्गत अशी उपाययोजना कधी करण्यात येईल असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

loading image