बार्शीटाकळी-अकोला मार्ग बनला धोकादायक

road
road

बार्शीटाकळी ः बार्शीटाकळी ते अकोला मार्गावर सद्यस्थिती खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने धुळीने वाहनधारकांना श्वसनाचा त्रास होत आहे. अश्यात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देऊन मार्गाची दुरूस्ती करण्याची व धुळीचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

मंगरूळपीरला जाण्यासाठी बार्शिटाकळी ते अकोला हा मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. परंतु, खडकी पासून ते बार्शीटाकळीपर्यंत मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. रस्त्याची दयनीय अवस्थेमुळे किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असतात. मार्गावर एवढे खड्डे झाले आहे की, वाहनचालकांना खड्डे वाचवावी की वाहन चालवावी हेच प्रश्न वाहनचालकास समोर पडलेला असतो. बार्शीटाकळी ते अकोला यातील अंतर फार कमी असल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील अनेक लोक खरेदी व विक्री करिता ये-जा करतात. परंतु, मार्गाच्या दुरवस्थेमुळे त्यांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून व्यवसायिकांवरही मालाची ने-आण करण्याचा प्रश्न उभा राहला आहे.

धुळीचे नियोजन करा
मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली व त्या खड्ड्यांमध्ये प्रशासनाने माती टाकली. खड्ड्यापासून वाचण्यासाठी टाकलेल्या मातीचे धुळीमध्ये रूपांंतर होऊन त्यामुळे आता वाहनधारकांना श्वसनाचा त्रास होत आहे. यामुळे या धुळीचे नियोजन करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

प्रवाश्यांच्या जीव मुठीत
मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने येथून रहदारी करणाऱ्या प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तालुक्यातून अनेक विद्यार्थी अकोला शहरात शिक्षणासाठी येतात अश्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन्यथा आंदोलन
बार्शीटाकळी ते अकोला मार्गावर पडलेले खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. यामुळे सर्व वाहन धारकांसह प्रवाश्यांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
-डॉ. प्रा. बिस्मिलाह खान, माजी सभापती, पं. स. बार्शीटाकळी

वाहनाचे होते नुकसान
बार्शीटाकळी ते अकोला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालविणे सुद्धा कठीण झाले आहे. परंतु, उदरनिर्वाहासाठी दुसरा रोजगार उपलब्ध नाही. दुसरीकडे खड्ड्यांमुळे ऑटोचेही नुकसान होत असून आर्थिक फटकाही सहन लागत आहे. मनक्याचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-अब्दुल खलील अब्दुल गणी, ऑटो चालक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com