नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी 

अकोला : दहावीचा बदललेला अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीचा विचार करता अकोला जिल्ह्यातील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी आणि अध्ययन स्तर समजून घेण्याकरिता खास मोबाईल अॅप तयार करण्यात आला असून, त्याद्वारे विनामूल्य पायाभूत आॅनलाइन चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांना ही चाचणी देण्यासाठी कोणचाही मोबाईल वापरता येणार आहे. त्यासाठी स्वतःचाच मोबईल असणे आवश्‍यक नाही. मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थी ही टेस्ट एकवेळ मोबाईलचा वापर करून देतील याची दक्षता घेण्याचे आदेश शिक्षणादिकाऱ्यांनी दिले आहेत. 

तीन दिवस चाचणी 
विद्यार्थांना एकवेळ गणित व विज्ञान विषयाची आॅनलाइन पायाभूत चाचणी ‘ईझी टेस्ट’ अॅपचा वापर करून १७ ते १९ जुलैदरम्यान देता येणार आहे. 

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी आॅनलाइन होणार आहे. 
विद्यार्थ्यांचा पाया कुठपर्यंत पक्का आहे, हे पाहण्यासाठी या चाचणीचा उपयोग होणार आहे. अभ्यासात मागे आसलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या चणीचा उपयोग होईल. कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोझा सहन न करता विद्यार्थ्यांना ही चाचणी देता येणार आहे. एका मोबाईल वर कितीही विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. 
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक 

पायाभूत चाचणीच्या मार्गदर्शक बाबी 
- ईझी टेस्ट अॅप सर्व अँड्रॉईड मोबाईलमध्ये प्लेस्टोर मधून डाउनलोड करता येईल. 
- नववी, दहावीचे विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या, अथवा कुणाच्याही अँड्रॉईड मोबाईलवर अॅप डाउनलोड करून इंस्टॉल करू शकता व त्यांच्या वर्गाचे गणित व विज्ञान विषयाचे पायाभूत चाचणी पेपर लगेच सोडवू शकता. 
- एकाच मोबाईलचा उपयोग करून कितीही विद्यार्थी पेपर सोडवू शकता. प्रत्येकाचा निकाल वेगळा जतन केला जातो. त्यामुळे कोणताच विद्यार्थी पायाभूत चाचणीपासून वंचित राहणार नाही. 
- प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पालकाचा मोबाईल नंबर व स्वतःच्या शाळेचा युडायस कोड माहीत असणे अभिप्रेत आहे. स्वतःच्या अथवा कोणाच्याही मोबाईलवर विद्यार्थी त्याच्या पालकाचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावं, आडनाव, व शाळेचा युडायस कोड वापरून पायाभूत चाचणीचा पेपर सोडवू शकणार आहे. 
- पेपर सोडविल्यानंतर लगेच विद्यार्थ्याला त्याचा निकाल बघायला मिळणार आहे. नेमका कोणता प्रश्न चुकला हे सुद्धा त्याला लगेच कळणार आहे. 
- शाळेतील किती विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडविली व त्यांना किती गुण मिळाले हे मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांना त्यांच्या मोबाईल मध्ये अॅपच्या माध्यमातून लगेच कळणार आहे.