बास्केटबॉल स्पर्धेच्या खर्चाचा प्रस्ताव त्रोटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर : महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या खर्चासाठी क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव त्रोटक असल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. बास्केटबॉल स्पर्धेसाठी एक नव्हे तर चार पत्रकार परिषदेसाठी एक लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी स्पष्ट केले.

महापालिका जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या सहकार्याने 17 ते 24 ऑगस्टपर्यंत महापौर चषक राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या एकूण 42 लाख 22 हजारांच्या खर्चाचा प्रस्ताव क्रीडा विभागाने तयार करून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला. प्रस्तावात पत्रकार परिषदेसाठी एक लाखाच्या खर्चाचे नमूद करण्यात आले आहे. यात पत्रकार परिषद किती होणार? याबाबत काहीही स्पष्ट नाही. यावरून प्रसारमाध्यमांनी एका पत्रकार परिषदेवर एक लाखाचा खर्च असे वृत्त प्रकाशित करून क्रीडा विभागाच्या कारभारावरच प्रश्‍न उपस्थित केले.
मुळात एक लाख रुपये दोन राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी आयोजित चार पत्रकार परिषदेवर खर्च करण्यात येणार असल्याचे सभापती प्रमोद चिखले यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या या दिरंगाईवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली. नागपूरला प्रथमच दोन राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या सहकार्याने प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: basketball tournament proposal news