मद्यप्राशन करून वाहन चालवाल तर खबरदार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

अकोला - मद्यप्राशन करून वाहन चालवत असाल तर खबरदार! असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, शहर वाहतूक पोलिसांकडून आता ब्रिथ एनालयजरने तुमची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये तुम्ही मद्यप्राशन केलेले आढळून आल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

ख्रिसमस आणि थर्टी फस्ट या दोन उत्सवांच्या आनंदात युवक मद्यधुंद होऊन वाहन चालवतात. त्यातच त्यांना अपघातालाही सामोरे जावे लागते. काहींना तर अशा घटनांमधून प्राणालाही मुकावे लागले आहे. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर रोज सांयंकाळी शहरातील विविध चौकात वाहनधारकांची ब्रिथ एनालयजरने तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी कशी करायची याचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. एकूण ५२ कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले असून, ते ४ ब्रिथ एनालयजर मशीनने वाहनधारकांची तपासणी करणार आहेत.

शहरात ब्रिथ एनलायजरच्या तपासणीत अद्याप एकही वाहनधारक आढळला नाही. मात्र तपासणी मोहीम अधिक सक्रीय करण्यात येणार आहे.
-विलास पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

अपघात रोखण्यासाठी सर्वकाही
शहरात आणि जिल्ह्यात अपघातामुळे अनेकांचे प्राण जात असल्याचे आपण पाहतो. हे प्रमाण कमी करण्यासाठी अशा मोहीम राबवणे गरजेचे आहे. त्यामुळेच ब्रिथ एनालयजरने वाहनधारकांची तपासणी ही मोहीम मोठ्या प्रमाणात सक्रीय करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Web Title: Be careful if you drive by alcohol