मधुमेहासोबत मित्रासारखे वागा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

नागपूर - मधुमेह हा छुपा शत्रू असतो. दुसऱ्याच आजाराची तपासणी करताना मधुमेहाचे निदान होते. याला बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. व्यायामाचा अभाव, आहारावर नियंत्रण नाही, उघड्यावरील पदार्थ, कामाचा वाढता ताण व नकारात्मक विचारांतून मधुमेह शरीरात येतो. यावर मात करण्यासाठी मधुमेहासोबत मित्रासारखे वागा, असा सल्ला डायबेटिज केअर ऍण्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी दिला. 

लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात रविवारी मधुमेहींसाठी "हॅलो डायबेटिज‘ अभ्यासवर्ग पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. उद्‌घाटन मेयोचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वहाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. एस. एम. पाटील, नगरसेविका चेतना टांक, डॉ. तरुण मिश्रा, डॉ. सीताराम अग्रवाल, डॉ. उदय गुप्ते, डॉ. प्रिया कोटीयार व श्रद्धा भारद्वाज उपस्थित होते. अपुरी झोप मधुमेहाला कारणीभूत ठरू शकते. यामुळे पुरेशी झोप घ्यावी, असे डॉ. गुप्ता म्हणाले. 

डॉ. मोहित झामड यांनी मधुमेहींमध्ये असणाऱ्या दातांच्या समस्यांवर विशेष व्याख्यान दिले. अभ्यासवर्गात उपस्थित झालेल्या मधुमेहींचा प्रश्‍नोत्तराचा वर्ग झाला. यात उत्तम प्रश्‍न विचारणाऱ्या मधुमेहीला पारितोषिक देण्यात आले. तर आयोजकांनी विचारलेल्या प्रश्‍नाला अचूक उत्तर देणाऱ्या मधुमेहींनाही बक्षीस देण्यात आले. डॉ. सरीता उगेमुगे यांनी डायबेटिज केअरच्या वाटचालीविषयी माहिती दिली.

पोटाचा घेर वाढू देऊ नका - डॉ. वहाणे
सध्या सगळेच करिअरच्या मागे धावत असून, आहार व व्यायाम विसरून गेले आहे. कार्यालय, कौटुंबिक व मानसिक टेंशनमुळे शरीरावर परिणाम होताना दिसतो. महिलांच्या पोटाचा घेर वाढत असल्याचे लक्षण आढळून आले की, मधुमेहाची जोखीम वाढते, अशी माहिती डॉ. वहाणे यांनी दिली. आठ ते दहा तास बैठे कामामुळे हा आजार शरीरात बळावतो. त्यामुळे डे बाय डे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be friend with diabetes