विद्युत लाइट सुरू करण्यावरून खटकले; मेव्हण्याच्या मदतीने तीने भावासोबतच...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

बिट जमादार मोहन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटबोरी येथील तक्रारकर्ता गजानन पांडुरंग घोडके (वय 36) डोणगाव पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला.

घाटबोरी (जि.बुलडाणा) : डोणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेले घाटबोरीमध्ये विद्युत लाइट चालू करण्याच्या कारणाने बहीण-भावाचे भांडण झाले तर या अगोदर नागेशवाडी गावात सुद्धा बहीण-भावाचे भांडण झाले होते. दोन्ही घटना वेगवेगळ्या आहे.

बिट जमादार मोहन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटबोरी येथील तक्रारकर्ता गजानन पांडुरंग घोडके (वय 36) डोणगाव पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला की, माझी बहीण दुर्गाबाई प्रदीप कुंडळे ही आमच्या घरी तीन-चार वर्षांपासून घरात राहते. 19 मेला सायंकाळी घरात अंधार असल्याने दुर्गाबाई भाऊ गजाननला म्हणाली लाइट चालू कर, तेव्हा गजानन म्हणाला तू लाईटबिल भरते का ! एवढ्याशा शुल्लक कारणावरून बहीण-भावात भांडण झाले.

हेही वाचा - अरे वा! एसटी बस धावणार, हेअर सलून उघडणार; असा ठरला 'टाईमटेबल'

तेव्हा दुर्गाबाईने गावातच राहत असले मेव्हणे दीपक रतन खेडकर व गोपाल रतन खेडकर यांना बोलावून घेतले तेव्हा दीपक व गोपालने आपल्या साला गजाननला भांडणाबद्दल विचारपूस केली. परंतु, शाब्दिकवाद विकोपाला जात असल्याने बहीण दुर्गाबाई, गोपाल खेडकर शिवीगाळ करून लाथा बुक्क्यानी मारहाण केली तर दीपक खेडकरने गजानन घोडकेला दगडी फरशीचा तुकडा जोरात मारल्याने गजानन रक्तभांबाळ अवस्थेतच डोणगाव पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला. 

त्यामुळे पोलिस स्टेशन मध्ये दुर्गाबाई कुंडळे व दीपक खेडकर, गोपाल खेडकर यांच्यावर गुन्हा नोंदविला. तर डोणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेले नागेशवाडी गावात सुद्धा फिर्यादी बहीण लक्ष्मी मोतीराम धंदरे (वय 22) हिने पोलिस स्टेशनला भाऊ शैलेश मोतीराम धंदरे यांच्या नावाचा रिपोर्ट दिला की, शेतामध्ये शैलेश आपल्या बायकोला मारहाण करत होता म्हणून बहीण लक्ष्मी सोडवण्यासाठी गेली. 

आवश्यक वाचा - धक्कादायक! मस्तवाल वाळू माफियाची मुजोरी; तहसीलदारांना शर्ट फाडून मारहाण

यावेळी शैलेश धंदरे यांनी बहीण लक्ष्मीच्या डोक्यात स्पिंकरचा पाइप जोरात मारल्याने लक्ष्मी ही रक्तभांबाळ अवस्थेतच डोणगाव पोलिस स्टेशनला, शैलेश मोतीराम धंदरे यांच्या नावाचा रिपोर्ट दिला. त्यामुळे शैलेश धंदरेवर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घटनांचा तपास डोणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात बिटजमादार मोहन सावंत व पोलिस नाईक सुभाष मस्के करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating brother with the help of brother in law at buldana district

टॅग्स
टॉपिकस