आश्‍वासनाच्या पलीकडे एकतरी चांगले मोठे काम दाखवा : विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण 19 टक्‍क्‍यावरून सध्या 6 टक्‍के करण्यात आले आहे. हे आरक्षण 19 टक्‍के करू, वेगळा विदर्भ करू म्हणून मोठमोठी आश्‍वासने भाजपच्या नेत्यांनी दिली होती. पूर्वी त्यांना अंडे मिळत होते, आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली म्हणून सर्व आश्‍वासने विसरून गेले. सरकारने आश्‍वासने न देता त्या पलीकडे जाऊन एकतरी चांगले काम दाखवावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आरमोरी शहरात प्रथम आगमनाप्रीत्यर्थ कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कम्युनिस्ट मित्रपक्षातर्फे महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेस अध्यक्ष माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार हरीराम वरखडे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भातकुलकर, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर वनमाळी, जिल्हा परिषदेचे सभापती आनंदराव आकरे, कॉंग्रेसचे देसाईगंज तालुकाध्यक्ष परसराम टिकले, कॉंग्रेसचे कोरची तालुकाध्यक्ष श्‍यामलाल मडावी, डॉ. कोपुलवार, प्रा. शशिकांत गेडाम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, सचिव अमिन लालानी, जिल्हा परिषद सदस्य अमोल वारकवार, चंदू वडपल्लीवार, सभापती अशोक वाकडे, जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, सभापती बगुजी ताडाम, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका मनोज अग्रवाल, रामभाऊ हस्तक, नगरसेवक सुदाम मोटवानी, नगरसेविका निर्मला किरमे, नगरसेविका बारसागडे, कीर्ती पत्रे, लोणारे, कापकर, रोशनी बैस, जिल्हा परिषद सदस्य मनीषा दोनाडकर, पंचायत समिती सदस्य विनोद बावनकर, किरण मस्के, सुभाष सपाटे, चिंतामण ढवळे, विजय सुपारे, तेजेश मडावी, नंदू खादेकर आदी उपस्थित होते.
आमदार वडेट्टीवार म्हणाले की, मोठ्या लोकांच्या फायद्यासाठी श्रीमंतांनी श्रीमंतांसाठी चालवलेले सरकार आहे. या सरकारला घरचा रस्ता दाखविण्याची गरज आहे. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com