भारत-पाक सामन्यादरम्यान रंगणार सट्टा 

crime
crime

अकोला : वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठा सामना म्हणून अोळख असलेल्या भारत-पाक सामना रविवारी (ता.१६) रंगणार आहे. तेव्हा या रंगतदार सामन्यावर सट्टा रंगणार यात शंका नाही. हा सट्टा बाजार रोखण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांवर असून, या दिवशी पावसाचा व्यत्यय न आल्यास रंगतदार सामन्याबरोबरच सट्टा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. 

३० मेपासून जागतिक स्तरावरील क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावल्या जात आहे. असे जरी असले तरी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने लागोपाठ कारवाया करून सट्ट्याची मुख्य लिंक चालविण्यात येणाऱ्या सट्टा बहाद्दरावर कारवाई करून सट्टा बाजाराचे कंबरडे जरी मोडले तरी लहान मोठे सट्टा बहाद्दर आपली लिंक कशाही पद्धतीने लावून सट्टा बाजार सुरू ठेवणार असल्याची गुप्त माहिती आहे. तेव्हा या दिवशी विशेष पथकासह अकोला पोलिसाना सतर्क राहून लक्ष ठेवणे गरजेचे असणार आहे. 

मुख्य लिंक उद्धवस्त तरी शक्यता अधिक 
विशेष पथकाने क्रिकेट सट्ट्याची देशभरातील ‘लिंक’ अकोल्यातून असल्याचा छडा लावण्यात यश आले. सट्ट्याचे मुख्य लाईनवर रेट देणाऱ्याचे काम अकोल्यातून होत असल्याची माहिती या कारवाईतून उघड झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ६ जून रोजी दुपारी छापा टाकून मुख्य लाईन उद्ध्वस्त जरी केली असली तरी भारत-पाक सामन्या दरम्यान सट्टा बाजार उसळणार यात शक्यता नाही. 

वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान दोन कारवाया 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यांवर खायवाडी सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर विशेष पथकाने बुधवारी ५ जून रोजी छापा टाकून यामध्ये दोघांना अटक करून ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर ही कारवाई करून २४ तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी विशेष पथकाने मुख्य लाईन चालविणाऱ्यास अटक केली होती. या वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यान केवळ दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, त्याही विशेष पथकाच्या आहेत हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com