Crime News : आधी आत्महत्या, नंतर भुताने खून केल्याचा चर्चा, पण...; पोलिसांनी उलगडलं गुढ

Murder
Murderesakal
Updated on

भामरागड : स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही समाजमनातील अंधश्रद्धेची जळमटे निघालेली नाहीत. भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात अंधश्रद्धेचे प्रस्थ मोठे आहे. त्यामुळे येथील एका महिलेचा गळफास लावलेला मृतदेह मिळाल्यानंतर आधी आत्महत्येची चर्चा होती. त्यानंतर या चर्चेला पाय फुटून भुतानेच तिचा खून केला, अशी खमंग चर्चा परीसरात रंगू लागली होती.

Murder
Crime : 'त्या' व्यक्तीच्या हत्येचं गुढं उकललं; गैरवर्तनाला कंटाळून सख्ख्या पुतण्यानेच...

दरम्यान लाहेरी पोलिसांनी एक महिन्याच्या अथक तपासानंतर हा खून भुताने नाही, तर तिच्याच नात्यातल्या युवकाने केल्याचे सत्य उघडकीस आले आहे. गुड्डू दशरथ गावडे (वय २५, रा. इरपनार), असे आरोपीचे नाव असून कल्पना विलास कोठारे असे मृत महिलेचे नाव आहे.

साधारणतः एक महिन्यापूर्वी मलमपुदूर येथील शेतामध्ये कल्पना विलास कोठारे या महिलेचा नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेला मृतदेह ग्रामस्थांना दिसला. तिने आत्महत्या केल्याचा सर्वांचा गैरसमज झाला. मात्र, ही आत्महत्या नसून कुणीतरी तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय पोलिसांना असल्याने लाहेरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु पुरावा मिळत नसल्याने पोलिस संभ्रमात होते.

Murder
Raj Thackrey: मनसे विरुद्ध भाजप संघर्षाला सुरुवात, ठाकरे-शेलारांमध्ये जुंपली! मोठ्या नेत्यांवर...

ही घटना शेतामध्ये झाल्याने कोणीही ही घटना पाहिली नव्हती. अथवा कुठलेही परीस्थितीजन्य पुरावे पोलिसांना मिळत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांकडे व गावकऱ्यांकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली. दरम्यान कल्पनाचा खून विलास कोठारे यांच्या पहिल्या मृत पत्नीच्या, निर्मलाच्या भूताने केल्याची चर्चाही नातेवाईक व गावकऱ्यांत होऊ लागली होती.

साक्षीदारांना तपासून आणि सखोल तपास करून लाहेरी पोलिसांनी तब्बल एक महिन्यानंतर आरोपी गुड्डू गावडे याला हुडकून काढले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्यामुळे भुताने अंगात येऊन खून केल्याच्या अंधश्रद्धायुक्त चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाचीवरच होता डोळा...

आरोपी गुड्डू गावडे याच्या बहिणीचे लग्न मृतक कल्पनाचे पती विलास कोठारे यांच्या लहान भावाशी झाले होते. त्यांच्या राइसमिलचे काम मृतक कल्पनाच बघत होती व तिथे गुड्डू गावडे ऑपरेटर म्हणून काम करत होता. विलास कोठारे यांची पहिली पत्नी निर्मला हिचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. तिला एक मुलगी असून ती एलएलबी प्रथम वर्षात शिकत आहे. खरेतर नात्याचा विचार करता ही मुलगी गुड्डूची भाची लागत होती. तरीही त्याची या मुलीवर वाईट नजर होती. कल्पनाला त्याच्या हेतूची माहिती मिळाल्याने तिने त्याला खडसावले होते. त्यामुळे गुड्डूने तिचा काटा काढायचे ठरवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Crime
Police Crack Husband Murder Case; Wife and Alleged Lover Taken into Custody
One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Suitcase Murder Case Cracked: Police Reveal Motive Behind Lover’s Killing
Marathi News Esakal
www.esakal.com