Crime : 'त्या' व्यक्तीच्या हत्येचं गुढं उकललं; गैरवर्तनाला कंटाळून सख्ख्या पुतण्यानेच...

.
crime
crimesakal

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : गुंजी धामणगाव रस्त्यावर तरोडा फाट्यासमोर एका व्यक्तीचा शेतात मृतदेह आढळला होता. त्याच्या हत्येचे रहस्य उलगडले असून, या कटात मृत व्यक्तीचा सख्खा पुतण्या आणि मुलगा सहभागी असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली.

crime
Nagpur : नागपूरला मिळणार नवीन शैक्षणिक हब ओळख! सीएम, डीसीएम यांनी घेतला IIT बाबत आढावा

अभी सतीश कुरटकार (वय १९, रा. जळगाव आर्वी, ता. धामणगावरेल्वे) व त्याचा चुलतभाऊ यश जगदीश कुरटकार (वय १९, रा. खडक सावंगा, बाभूळगाव) असे हत्याप्रकरणी अटक सख्ख्या चुलतभावांची नावे आहेत. सतीश यांच्या गैरवर्तनाला कंटाळू मुलगा अभी व पुतण्या या दोघांनी मिळून १९ मे २०२३ रोजी सतीशचा कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली होती.

crime
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

अपघातात डॉक्टर गंभीर जखमी

दर्यापूर ते अकोला मार्गावरील लासुर ते सौंदळीच्या मध्यभागी रविवारी (ता. २१) साडेबारा वाजताच्या दरम्यान एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन त्यात वाहनचालक डॉक्टर गंभीर जखमी झाला. अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले अजय हत्तीसिंग सोळंके हे आज रविवारी अमरावती येथून अकोलाकडे जात असताना सौंदळी ते लातूरच्या मध्यभागी त्यांचे वाहन चालवताना नियंत्रण सुटले व वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. यामध्ये जखमी अजय सोळंके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com