भामरागड तालुक्‍यात पूरस्थिती कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

गडचिरोली : जिल्ह्यात मागील दहा दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे भामरागड तालुक्‍यातील शंभरावर गावे अजूनही संपर्काच्या बाहेर आहेत. पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहत
असल्याने भामरागड-आलापल्ली या मार्गाची वाहतूक शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही बंद होती. शहरात पुराचे पाणी असल्याने 50 कुटुंबे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली.
जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने उसंती दिली. मात्र, नदी व नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक मार्गांची वाहतूक ठप्प झाली आहे. मेडपल्ली येथील संजय कोडापे हा तरुण गुरुवारी (ता. 8) पामलगौतमी नदीच्या पुरात वाहून गेला. बचाव पथक त्याचा शोध घेत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhamragarh still under water