Election Results 2019 : साकोलीतून भाजपचे डॉ. परिणय फुके आघाडीवर, नानांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भंडारा-गोंदिया विधानपरिषदेचे आमदार असलेले डॉ. फुके राज्याचे वनराज्यमंत्री असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. कॉंग्रेसने महाराष्ट्र प्रचार प्रमुख तथा किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांना उमेदवार देताच भाजपचे डॉ. फुके यांना उमेदवारी दिली. यामुळे एकीकडे वनराज्यमंत्री तर दुसरीकडे कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते एकामेकांसमोर उभे ठाकल्याने या तुल्यबळ लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भंडारा : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या साकोली मतदारसंघात भाजप उमेदवार राज्याचे वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके आघाडीवर आहेत. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माजी खासदार नाना पटोले यांना मागे टाकले आहे.
भंडारा-गोंदिया विधानपरिषदेचे आमदार असलेले डॉ. फुके राज्याचे वनराज्यमंत्री असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. कॉंग्रेसने महाराष्ट्र प्रचार प्रमुख तथा किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांना उमेदवार देताच भाजपचे डॉ. फुके यांना उमेदवारी दिली. यामुळे एकीकडे वनराज्यमंत्री तर दुसरीकडे कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते एकामेकांसमोर उभे ठाकल्याने या तुल्यबळ लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिसऱ्या फेरीअखेर डॉ. फुके यांनी 16,668 मते मिळाली असून कॉंग्रेसचे नाना पटोले यांना 15,632 मिळाली आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल करून कॉंग्रेसच्या पंरपरागत व्होटबॅंकचे विभाजनाचा फटका नाना पटोले बसण्याची शक्‍यता आहे.
भंडारा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप उमेदवार अरविंद भालाधरे यांना मागे टाकले आहे. तिसऱ्या फेरीत भोंडेकर यांना 14,644 मते मिळाली असून भालाधरे यांना 9,928 मते मिळाली नाही. पहिल्या फेरीपासूनच भोंडेकर यांनी आघाडी घेतली असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू कारेमोरे व भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांच्यात खरी लढत आहे. सहाव्या फेरीअखेर राजू कारेमोरे यांनी आघाडीवर आहे. तर, येथील भाजप उमेदवार प्रदीप पडोळे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहे. सहाव्या फेरीअखेर कारेमोरे यांना 17,218 तर चरण वाघमारे यांना 16,883 मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार चरण वाघमारे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार राजू कारेमोरे आघाडी काही फेरीत कपात करीत असल्याने त्यांच्या लढतीत चुरस वाढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara District trends, Election Results 2019