Bhandara Gondia Lok Sabha 2024 : काँग्रेस-भाजपचे उमेदवार निश्चित; रंगणार अटीतटीची लढत

महायुतीकडून सुनिल मेंढे, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Bhandara Gondia Lok Sabha
Bhandara Gondia Lok SabhaeSakal

भंडारा लोकसभेत तुमसर,भंडारा, साकोली व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व अर्जुनी मोरगाव या मतदारसंघांचा समावेश आहे. तुमसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) व भंडारा मतदारसंघातील अपक्ष आमदार सध्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) आहेत. साकोली मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहेत. तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघात भाजपचा आमदार आहेत. गोंदिया मतदारसंघात अपक्ष व तिरोडामध्ये भाजपचे विजय रहांगडाले आणि अर्जुनी मोरगाव मध्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार) मनोहर चंद्रिकापुरे हे आमदार आहेत.

२०१९ चे चित्र

सुनील मेंढे (भाजप) विजयी मते : ६,५०,२४३

नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ४,५२,८४९

डॉ. विजया नंदुरकर (बसप) मते : ५२,६५९

के. एन. नान्हे (वंचित बहुजन आघाडी) मते : ४५,८४२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,९७,३९४

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

Bhandara Gondia Lok Sabha
Pune Lok Sabha 2024: हॅट्‌ट्रिक होणार की चमत्कार? धंगेकर 'भाऊ' की मोहोळ 'अण्णा', पुण्यात कोण करणार हवा

सद्य:स्थिती

महायुतीकडून सुनिल मेंढे, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार) नेते प्रफुल्ल पटेल यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

ओबीसी, अनुसूचित जातींची मते महाआघाडीकडे गेल्यास महायुतीला त्रासदायक ठरू शकते.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या भागात ज्वलंत आहे.

धानाचे चुकारे व बोनसचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

रखडलेला भेल प्रकल्प.

वैनगंगा व गोंदिया येथील पांगोली नदीचे प्रदूषण.

Bhandara Gondia Lok Sabha
Buldana Lok Sabha 2024: बुलढाण्यात फाटाफुटीने राजकीय चित्र धूसर; 25 वर्षांपासून शिवसेनेचा गड, मतदार कोणाला कौल देणार?

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com