भंडारा-गोंदियाच्या रणसंग्रामात भारिप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

अकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे. या मतदारसंघात भारिप-बमसंकडून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतविरण्यात येणार आहे. मतदारसंघातील सामाजिक समीकरण, शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत भारिपने मोर्चेबांधणी सुरू केल्याने सत्ताधारी भाजप सोबतच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला भारिपच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवित भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक आता 28 मे रोजी आणि मतमोजणी 31 मे रोजी होणार आहे.
Web Title: bhandara-gondia loksabha constituency byelection bharip party politics