

Bhandara forest team successfully reunites abandoned cub with mother.
sakal
साकोली : तालुक्यातील पाथरी शिवारात शनिवारी बिबट प्रजातीचे अशक्त शावक आढळून आले. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची बिबट मादीसोबत भेट घडवून आणण्याकरिता परिसरात उपाययोजना सुरू केल्या. त्याला यश आले असून त्या शावकाचे दुरावलेल्या मादी बिबटसोबत पुनर्मिलन झाले. पाथरी येथील केशव धर्माजी बाळबुध्दे यांच्या शेतात शनिवारी बिबटचे शावक (वय अंदाजे २ महिने) चिखलात असल्याचे दिसले. तेव्हा संबधितांनी याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी साकोली यांना दिली. नंतर त्यांच्यासह क्षेत्रीय वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपवनसंरक्षक भंडारा व सहाय्यक वनसंरक्षक साकोली यांनाही माहिती देण्यात आली.