बचेवाड़ी (जिल्हा भंडारा) ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यास मारहाण 

शाहिद अली
शनिवार, 22 जुलै 2017

कर्मचारी हा ग्रामपंचायत येथे निघुन गेला व सायंकाळी 5 च्या सुमारास ग्रामपंचायत समोरील पान टापरी येथे आरोपी ने कर्मचारीला पहातच लाकड़ी दंडयानी जबरदस्त मारहाण केली

पवनी: (जिल्हा भंडारा) तालुक्यातील बाचेवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी देवेन्द्र नामदेव लांजेवार यानी कर वसुलीची मागणी केल्याने थकित कर्जदार नागेश दामोधर नखाते यांनी त्यांना लाकड़ी दांडक्याने मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे.

आरोपी नखाते याच्यकड़े ग्रामपंचायत चा दोन वर्षा पासून सुमारे 5000 रूपयाचे कर थकित  होते  गावतील थकित कर वसूली करण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई  देवेंद्र लांजेवार गावत फिरत होते आरोपी च्या घरी कर वसुलीला गेले तर करवसुली मागणी केल्याने कर्मचारिला धक्का बुक्की केली. कर्मचारी हा ग्रामपंचायत येथे निघुन गेला व सायंकाळी 5 च्या सुमारास ग्रामपंचायत समोरील पान टापरी येथे आरोपी ने कर्मचारीला पहातच लाकड़ी दंडयानी जबरदस्त मारहाण केली.

घटना स्थळी असलेल्या गावकरी यांनी कर्मचारीला आरोपीच्या तावड़ीतुन सोडवून पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: bhandara news: beating crime