A 28-year-old worker died in a tiger attack while returning home along the Garada-Basora canal road.
esakal
भंडारा : नागपूर जिल्ह्यातील वेलतूर येथून काम आटोपून घरी परतणाऱ्या बासोरा येथील तरुणावर वाघांच्या जोडीने हल्ला केला. यात अमित भीमराव राऊत (वय २८) याचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. २६) सायंकाळी गराडा-बासोरा कालवा मार्गावर ही घटना घडली. अमितचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.