Bharat Bandh : जिल्ह्यात बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

कोराडी - पेट्रोल-िडझेल वाढ व महागाईच्या विरोधात निदर्शने करताना कार्यकर्ते.
कोराडी - पेट्रोल-िडझेल वाढ व महागाईच्या विरोधात निदर्शने करताना कार्यकर्ते.

नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आमदार प्रा. जोंग्रेद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी जाहीर पाठिंबा दिला होता. आंदोलनात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, आशीष दुवा, आमदार सुनील केदार, राजेंद्र मुळक, एस. क्‍यु. झमा, सुरेश  भोयर, नाना गांवडे, संजय मेश्राम, मुजिफ पठाण, बाबूराव तिडके, कुंदा राऊत, तक्षशीला  वाघधरे, रमेष जोध, हुकुमचंद आमधरे, मनोहर कुंभारे, गंगाधर रेवतकर, पद्माकर कडू, विनोद हरडे, सुरेश पौनिकर, सूरज ईटनकर, दिलीप गुप्ता, बंडू ढाकुणकर, किरण नागरीकर, नाना कंभाले, रत्नदीप रंगारी, शहाजहा शफाअत, अहमद शकुर नागाणी, अनिल राय यांच्यासह समस्त पदाधिकारीगण व कार्यकर्ते उपस्थित होते.

सावनेरात काँग्रेसची रॅली
सावनेर - शहरात सकाळीपासून बंद पाळण्यात आला. एसटी व खासगी सेवाही बंद होती. आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू होती. शहर काँग्रेसचे अध्यक्ष पवन जैस्वाल, सचिव विजय बसवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तहसीलदार राजू रणवीर व पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राजेश खंगारे, डोमासाव सावजी, दीपक बसवार, मनोज बसवार, सुनील चाफेकर, तेजसिंग सावजी, गोपाल घटे, योगेश पाटील, आश्विन कारोकार, शफिक सय्यद, सोनू देशमुख, चंदू कामदार, किरण मंगरुले, शैलेश नाईक, मोहन कमाले उपस्थिती होते.

हिंगणा-वानाडोंगरीत दुकाने बंद
वानाडोंगरी/ हिंगणा - काँग्रेसचे नेते बाबा आष्टनकर, अशोक पुनवटकर ,हिंगणा तालुका महीला काँग्रेसच्या अध्यक्ष शालिनी मनोहर, निलीमा नागदेवे, संगीता घवघवे, सुरेखा जिचकार, नारायण फटिंग, सीता चव्हाण व रायपूरचे सरपंच प्रेमलाल भलावी यांनी बंद यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले. 

भिवापुरात चक्काजाम, वाहतूक विस्कळीत 
भिवापूर -
 व्यावसायिक प्रतिष्ठाने व किरकोळ विक्रेते यांचीही दुकाने दिवसभरासाठी बंद राहीली. आंदोलनानंतर तहसीलदार डी. जी. जाधव यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनकर्त्यांमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, सोपान दडवे, लव जनबंधू, कुंदा कंगाले, किरण नागरीकर,  रेखा नागपुरे, वर्षा ठाकरे, संगीता गोवर्धन, विठ्ठल पाटील, चंद्रशेखर ढाकुणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष फुलसिंग चव्हाण, स्वप्नील धनविजय, बसपचे दुधिराम जनबंधू, शाबीर पटेल, वंदना सेलोकर, निर्मला कामडी, पुष्पा सेलोकर, प्रेमीला श्रीरामे, दिलदार पठाण, विजय अंबादे, कवडू नागरीकर, संजय शेंडे, सुनील पौनीकर, वसंता ढोणे, महिपाल शेंडे, राजू मेश्राम, बळवंत जांभूळकर आदींचा सहभाग होता.

काटोलमध्ये तहसीलदारांना दिले निवेदन
काटोल/कोंढाळी -
 काटोल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. प्रदेश  काँग्रेस कमिटीचे विभागीय समन्वयक प्रकाश वसू, प्रतापराव ताटे, काटोल तालुकाध्यक्ष राष्ट्रपाल पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश चव्हाण, शहराध्यक्ष पुरुषोत्तम काकडे, विलास कडू, अशोक काळे, अश्विनी नागमोते, निलम वानखेडे यावेळी उपस्थित होते.

बुटीबोरी बंदला लाभला प्रतिसाद...
बुटीबोरी -
 काँग्रेसने पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबद्दल निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे मुजिब पठाण, अहमद शेख, बिजाराम किनकर, सुधीर देवतळे, बल्लू श्रीवास, सुधाकर कैकाडी, गुलाब वरघने, अशोक जयस्वाल, राजू गावंडे, सुरेश वलीवकर, आशिष वरघने, युसूफ शेख, सुनील हिवसे, राहुल पटले, नागेश गिऱ्हे, शुभम पांडे उपस्थित होते.

नगरधनमध्ये सायकल मोर्चा
नगरधन -
 रामटेक तालुक्‍यातील नगरधन येथे काँग्रेसचा बंद यशस्वी ठरला. नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी यांच्या नेतृत्वात गावातून पेटोल, डिझेल दरवाढीचा निषेध करीत सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शंकर होलगीरे, प्रशांत लोणारे, भूषण कडुकर, चंद्रकांत नंदनवार, अनिल देशमुख, सचिन खागर, बाबा चिंटोले, रामदास बावनकुळे, भूषण होलगिरे आदी उपस्थित होते.

बंदच्या दिवशी बंद यशस्वी
उमरेड -
 उमरेड नगर काँग्रेसच्या वतीने इंधनाचे दर कमी करावे यासह विविध मागण्यांसाठी इतवारी पेठेतून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढली. उपविभागीय अधिकारी जनार्दन लोंढे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले नाहीत. 

मनसेतर्फे पेट्रोल दरवाढीचा निषेध 
हिंगणा एमआयडीसी -
 महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणातर्फे सरचिटणीस हेमंत गडकरी, जिल्हाध्यक्ष सतीश कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे यांच्या नेतृत्वात हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सर्व बाजारपेठा व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. या वेळी सचिन चिटकुले, प्रशांत वाघ, शुभम भोकरे, मुकेश देवगडे, महेश शाहू, आकाश निघोट, शैलेश गायकी, दिनेश जुनघरे, गणेश बरवटकर, रोशन वडुले, श्रीनिवासजी, सौरभ अंबलकर, अविनाश चिंचुलकर उपस्थित होते.

महादुला-कोराडी येथे रास्ता रोको 
कामठी/कोराडी -
 महादुला देवी मंदिर टी-पॉइंट ते शिवाजी नगर, मजदूर चौक व महादुला बसस्थानकापर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बडग्याचे दहन करण्यात आले. या वेळी जि. प. सदस्य नाना कंभाले, नगरसेवक रत्नदीप रंगारी, सुनील साळवे, संजय रामटेके, भूदेव वांढे, वसंतराव गाडगे, सुधीर धुरिया, मंगल सुरडकर, अंकुश डाखोळे, वासुदेव बेलेकर, लक्ष्मीकांत धनुले, चेतन मांडवकर, तिलकचंद गजभिये, भगवान मासुलकर, अर्शद शेख, विशाल मेश्राम आदी उपस्थित होते. 

बंदला नरखेड तालुक्‍यात संमिश्र प्रतिसाद
जलालखेडा/नरखेड -
 सर्वपक्षीय भारत बंदला नरखेड तालुक्‍यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काटोल व वरुड आगारातील सर्व एसटी बससेवा पूर्णत: बंद होती. याचा प्रवाशांना फटका बसला. जलालखेडा येथील बसस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.   

कुही बंद 
कुही/मांढळ -
 मांढळ येथील वैद्य चौकातून मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. या वेळी कुही तालुका काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य उपासराव भुते, मांढळचे सरपंच शाहू कुलसंगे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव राजानंद कावळे, पंचायत समिती सदस्य संदीप खानोरकर, उपसरपंच सुखदेव जिभकाटे, पूनम वासनिक, गीता सोनकुसरे, रोशन सोनकुसरे, विनय गजभीये, नरेंद्र बारई, किशोर कुर्जेकार, सुधीर पिल्लेवान, सुधीर वासनिक, सचिन दुधपचारे, नलिनी मेश्राम, मंजू भुते, शीला नागदेवे, भारती नान्हे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाडीत कडकडीत बंद; ऑटो संघाचा सरकारविरोधात जनाक्रोश
वाडी -
 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात आले. 

या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशीष दुवा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, काँग्रेस नेते नाना गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश बंग, नगरसेवक राजेश जैस्वाल यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेसचे पदाधिकारी कुंदा राऊत, प्रकाश कोकाटे, जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे, न. प. उपाध्यक्ष राजेश थोराने, शहराध्यक्ष शैलेश थोराने, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष नरवाडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्‍याम मंडपे, प्रा. सुरेंद्र मोरे, राजेश जिरापुरे, दिलीप दोरखंडे, प्रवीण लिचडे आदींसह मोठ्या संख्येने एकत्रित येऊन बॅनर, झेंडे घेऊन बंद समर्थनार्थ जोरदार नारे देण्यात आले. वाडी येथे संपूर्ण बाजारपेठ बंद होती. 

व्यावसायिकांनी बंदला समर्थन दिले. ट्रान्सपोर्ट फ्रेंड्‌स असोसिएशनचे सुनील पांडे, नरेंद्र मिश्रा, संजय वर्मा, दिनेश बारापत्रे, दीपक पांडे, ओमप्रकाश राष्ट्रवादी टान्सपोर्ट आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशील शर्मा, स्वामिप्रसाद सूद, प्रमोद खोब्रागडे, मनोज सिंग, सुनील सिंग, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव नीतेश जंगले, सचिन मेश्राम, अतुल शेंडे यांनीही बंदचे समर्थन केले. उत्तर भारतीय सभेचे अध्यक्ष प्रवीण सिंग सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com