मराठा आरक्षणाचा प्रश्न असामाजिक तत्त्वांनी चिघळवला : भय्याजी जोशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नागपुर : मराठा आरक्षणाचा प्रश्न काही असामाजिक तत्त्वांनी चिघळवला आहे. या मुद्द्यावर शांततने तोडगा निघाला पाहिजे. हिंसक आंदोलने करून काहीच साध्य होणार नसल्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिला.

अजनी भागाच्या सेवा विभागाच्या कार्यक्रमात भय्याजी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षण मुद्द्याचे राजकारण केले जात आहे का? असे विचारले असता त्यांनी "मला माहिती नाही' असे उत्तर दिले. रा. स्व. संघावर अहमदनगरमध्ये संभाजी ब्रिगेडने गंभीर आरोप केले होते. गर्दीत साप सोडणे, दंगल घडवणे अशी विकृती संघाचे लोकच करू शकतात. "पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री जाणीवपूर्वक मराठ्यांना बदनाम करत असून आरएसएसच्या लोकांनाच पंढरपुरात दंगल करून मराठा समाजाला बदनाम करण्याचा बेत संभाजी ब्रिगेडने हाणून पाडला, असे विधान ऍड. मनोज साखरे यांनी केले होते. याच पार्श्‍वभूमीवर भय्याजी जोशी यांनी आपले मत व्यक्‍त केले.

Web Title: bhayyaji joshi on maratha reservation