भीम आर्मीचा राणा दाम्पत्याला विरोध; कारण...

Bhim Army opposes Rana couple
Bhim Army opposes Rana coupleBhim Army opposes Rana couple

अमरावती : तब्बल ३६ दिवसांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे नागपुरात आगमन झाले. हनुमान मंदिरात चालिसा म्हटल्यानंतर ते अमरावतीला गेले. येथेही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र, इर्विन चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोर राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे समजताच भीम आर्मीच्या (Bhim Army) कार्यकर्त्यांनी याचा विरोध केला. यामुळे राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा म्हणता आली नाही. (Bhim Army opposes Rana couple)

सायंकाळी अमरावतीत पोहोचल्यानंतर राणा दाम्पत्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. अशीच तयारी इर्विन चौकात कार्यकर्त्यांकडून केली होती. यावेळी ते हनुमान चालिसा म्हणणार असल्याची माहिती भीम आर्मीच्या (Bhim Army) कार्यकर्त्यांना मिळाली. राणा दाम्पत्य इर्विन चौकात पोहोचताच विरोध करण्यास सुरुवात झाली.

Bhim Army opposes Rana couple
एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन; हसन मुश्रीफ यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचा परिसरात हनुमान चालिसा म्हणू देणार नाही. हनुमान चालिसेला आमचा विरोध नाही. मात्र, बाबासाहेबांच्या परिसरात म्हणायचं नाही, अशी आक्रमण भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यांच्याच माणसाने आम्हाला ते हनुमान चालिसा म्हणणार असल्याची माहिती दिली. यामुळे आम्ही विरोध केला, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याने सांगितले.

बाबासाहेबांचे नाव घेत नाही

बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही लहानाचे मोठे झालो. मात्र, बाबासाहेबांचे नाव कोणीच घेत नाही. जे नाव घेतात ते त्यांच्या पुतळ्यासमोर डोकं टेकतात. आम्ही नाव घेतो म्हणून डोकं टेकवण्यासाठी आलो, असे खासदार नवनीत राणा (navneet rana) म्हणाल्या.

Bhim Army opposes Rana couple
राज्यमंत्री बच्चू कडू यांची महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी; म्हणाले...

संविधान नसते तर तुरुंगातच असतो

हनुमान चालिसा म्हणणार असल्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकण्यात आले. आज आम्ही तुरुंगाच्या बाहेर आलो ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे. संविधान नसते तर आम्ही तुरुंगातच असतो. ‘जय संविधान, जय बाबासाहेब’ असे आमदार रवी राणा (ravi rana) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com