वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...

नागपूर : माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित शब्दसुरांची भावयात्रा कार्यक्रमात गझल सादर करताना भीमराव पांचाळे.
नागपूर : माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित शब्दसुरांची भावयात्रा कार्यक्रमात गझल सादर करताना भीमराव पांचाळे.

नागपूर : "वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो आरशावरती आता,
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'
या बरोबरच "चंद्र तोच आहे, रात तीच आहे, सोबतीस माझ्या मात्र तीच आहे..' सुरेश भट यांच्या गझलेसह अनेक अप्रतिम गझलांची भावयात्रा लोकप्रिय गझल गायक भीमराव पांचाळे यांनी सादर केली.
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने मराठी गझल गायनाचा भावरम्य आविष्कार "शब्दसुरांची भावयात्रा' मंगळवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर करण्यात आली. लोकप्रिय गझलगायक भीमराव पांचाळे यांनी कार्यक्रमात विविध गझला सादर केल्या. कार्यक्रम विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याने सभागृहात ज्येष्ठांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाला पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, दै. "सकाळ'चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, उपेंद्र कोठेकर, प्रवीण दटके व मोहन मते यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा खेळाडू गुरुदास राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भीमराव पांचाळे यांनी इलाही जमादार यांची "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा', संगीता जोशी यांची "जीवनाला दान द्यावे लागते, श्‍वास संपेतो जगावे लागते', वा. न. सरदेसाई यांची "हे का कुणी फुलांना सांगायला हवे.. त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे', इलाही व दीपक यांची "ऐ सनम आखों को मेरी खूबसुरत साज दे.. येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे' आदी गझला सादर केल्या. नागपूरशी माझे खास नाते आहे. या शहराने मला खूप काही दिल्याने शहराची दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते, असे मनोगतही पांचाळे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com