esakal | भोंदूबाबा : मुलं होत नाही? अंगारा, धागा व लिंबू अन्... | Bhondubaba
sakal

बोलून बातमी शोधा

Bhondubaba

भोंदूबाबा : मुलं होत नाही? अंगारा, धागा व लिंबू अन्...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : भोंदूबाबा आणि अमरावती जणू हे समिकरणच झाले आहे. एक ना एक घटना सातत्याने येथे घडत असतात. समाजात कितीही प्रभोधन केले तर भोंदूगिरी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. यामुळे आपण खरचं २१ व्या शतकात वावरत आहो का, असा प्रश्न निर्माण होतो. अशाच एका घटनेत ‘अंनिस’ने एका भोंदूबाबाचा भंडाफोड केला.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती शहरातील अल्पेश गुणवंतराव पाटील (२४, रा. महादेव खोरी) हा स्वत:ला संतांचा अवतार असल्याचे नागरिकांना सांगत होता. मुलं होत नसेल तर सव्वा महिन्याचा उपवास करायला लावून महिलांच्या अंगावरून कापूर उतरवायचा. याची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार केली.

हेही वाचा: फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

ही महिला बाबाच्या दरबारात पोहोचली आणि दहा वर्षांपासून मुलं होत नसल्याचे सांगितले. यानंतर अल्पेशने महिलेला नारळ, धागा, बिडी व माचिस आणण्यास सांगितले. सामान आणल्यानंतर कापूर लावण्यास सांगितले. त्याने तो कापूर महिलेच्या अंगावरून उतरवला. अंगारा, धागा व लिंबू देत महिलेला सव्वा महिन्याचा उपवास करण्यास सांगितले. यादरम्यान महिलेने याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत अल्पेशविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

loading image
go to top