एसआरपीएफ वसाहतीत शिरला बिबट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अमरावती : चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा जंगलानजीक राज्य राखीव दलाच्या वसाहतीत बिबट्या शिरल्याच्या व त्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. बिबट्याच्या अस्तित्वाने या परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांत बिबट्याने दोन कुत्र्यांची शिकार केली.
राज्य राखीव पोलिस दल वसाहतीत सोमवारी (ता.12) रात्रीच्या सुमारास एका घरातून लॅब्राडॉर जातीच्या कुत्र्याला नेले. त्यानंतर मंगळवारी लगतच्या वैष्णवदेवी मंदिर पारिसरातील जनावराच्या गोठ्यातील कुत्र्याची शिकार केली. सलग दोन घटनांमुळे या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

वडाळी, पोहरा, भानखेडा, मोगरा या एकमेकांना लागून असणाऱ्या खुरट्या मात्र घनदाट जंगलामुळे या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. या जंगलाला लागूनच राज्य राखीव पोलिस दल कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या वसाहतीमधील पोलिस निरीक्षक मारोती नेवारे यांच्या बंगल्याच्या आवारातून बिबट्याने लेब्राडॉर जातीचा कुत्रा ओढत नेऊन त्याची शिकार केली.
सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून कुत्र्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. राज्य राखीव दल वसाहतीपासून काही अंतरावर असलेल्या वैष्णवदेवी मंदिर पारिसरातील अहमद फिरोज मोहमद हमीद यांच्या म्हशीच्या गोठ्यात असलेल्या कुत्र्याची शिकार दुसऱ्या दिवशी केली. यावेळी इतर कुत्रे जोरात भुंकायला लागल्याने बिबट्या आला की, काय या शंकेने श्रीपाद खोरगडे, अहमद फिरोज मोहमद हमीद यांनी गोठ्याच्या मागे जाऊन पाहिले. त्यावेळी बिबट्या कुत्र्याला ओढत नेत असल्याचे त्यांना दिसले. या परिसरात बिबट्याचा वावर नित्याची बाब बनलेली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे निर्माण झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bibat in the Colony of the State Reserve police Force