

Accident
sakal
गडचिरोली - आष्टी-चंद्रपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा मात्र थोडक्यात जीव वाचला आहे. पण आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना ६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास धानापूर येथील जिनिंगजवळ घडली.