अमरावतीत अशाप्रकारे लावली जातेय बायोमेडीकल वेस्टची विल्हेवाट... वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल रोहणकर, महापालिकेकडून डॉ. सीमा नैताम, अजय जाधव, समितीचे सदस्य सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते.

अमरावती : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जैववैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे. कुठेही उल्लंघन झाल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल रोहणकर, महापालिकेकडून डॉ. सीमा नैताम, अजय जाधव, समितीचे सदस्य सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा कोविड रुग्णालयातून दरदिवसाला 65 ते 75 किलो जैविक वैद्यक कचऱ्याची निर्मिती होत असून त्याची विल्हेवाट हा नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा प्रश्न असून, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेणे आवश्‍यक आहे. जैव वैद्यक घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सामायिक सुविधा अमरावतीत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियुक्त संस्थेमार्फत जैविक वैद्यक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.

जिल्ह्यातील 485 रुग्णालये त्याच्याशी संलग्न आहेत. कलर कोडेड बॅग्जमध्ये घनकचरा गोळा केला जातो व त्यानंतर त्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने भस्मीकरण केले जाते, अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय पाटील यांनी दिली. संबंधित संस्था, रुग्णालये व यंत्रणांना हरित लवादाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी सूचना देऊन योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावे. आवश्‍यक तिथे तपासण्या कराव्यात, असे निर्देश श्री. नवाल यांनी दिले.

जैव वैद्यक घनकचऱ्याचे वर्गीकरण
बायो मेडीकल वेस्टचे लाल, निळ्या आणि पांढऱ्या या तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. शस्त्रक्रियेनंतर शरीराचे काही भाग फेकून दिले जातात, त्याशिवाय प्रसूतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू तसेच बॅंडेज, प्लास्टर, सिरींज, निडल याचे वर्गीकरण केले जाते. प्रादुर्भाव करणाऱ्या वस्तू लाल, कॉटन, बॅंडेज, प्लास्टर यांना निळ्या आणि सलाईन, सिरींजला पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये टाकून त्याचे वर्गीकरण केले जाते. 

हुश्श..! विदर्भाला नाही चक्रीवादळाचा धोका

प्रतितास दोनशे किलोची क्षमता
बायो मेडीकल वेस्टचे भस्मीकरण प्रकल्पात दर तासाला दोनशे किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे. सद्या दरदिवसाला 550 ते 600 किलो कचरा या प्रकल्पात येतो. कोविडमुळे त्यात 70 किलोची भर दर दिवसाला पडणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biomedical waste disposal arrengement in amravati