'बर्ड फ्लू'ची धास्ती, यवतमाळात चार हजार कोंबड्यांचा मृत्यू

bird flu outbreak fear due to four thousand hens died in yavatmal
bird flu outbreak fear due to four thousand hens died in yavatmal

यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या जिल्ह्यात आता 'बर्ड फ्लू'च्या संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आर्णी तालुक्‍यातील मोराचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत यवतमाळ शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील पोल्ट्रीमध्ये चार हजार बर्डचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी सुरक्षितता म्हणून दहा किलोमीटरचा परिसर ऍलर्ट झोन म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत मरण पावलेल्या पक्ष्यांचा एच 1, एन 1 या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील पशुसंवर्धन यंत्रणाही सज्ज झाली आहे. कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणावर नियंत्रणात आली असतानाच आता 'बर्ड फ्लू'चा धोका निर्माण झालेला आहे. मागील काही दिवसांपासून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यातही वाढता आहे. पांढरकवडा तालुक्‍यातील लिंगटी (सायखेडा) येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. आर्णी तालुक्‍यात आठ मोर दगावले आहेत. आर्णी येथील मोरांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने या ठिकाणी ऍलर्ट झोन घोषित करून उपाययोजना राबविले जात आहेत. कोंबडी, मोर यानंतर कावळा अशा पक्ष्यांचे मृत्यू होत असल्याने त्यांचे नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आलेले आहेत. या ठिकाणाहून आतापर्यंत मोरांचे नमुने आले आहेत. अजूनही अनेक नमुने प्रलंबित आहेत. गेल्या दोन दिवसांत शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील पोल्ट्रीमधील पक्षाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (ता.18) जवळपास एक हजार 700 बर्ड, तर मंगळवारी (ता.19) दोन हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत तीन हजार 700 हजार पक्षी मृत्यूमुखी पडले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बलदेव रामटेके यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. तपासणी करून काही नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सांगितले. 

यवतमाळ शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा येथे दोन दिवसांपासून पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांत जवळपास तीन हजार सातशे पक्षी मृत झालेत. संबंधित परिसरात ऍलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना राबविल्या जात आहेत. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या भागात लक्ष ठेवून आहेत.
-डॉ. बलदेव रामटेके, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ.

लिंगटी येथील नमुने निगेटिव्ह -
पांढरकवडा तालुक्‍यातील लिंगटी येथे पोल्ट्रीमधील बर्डचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणाचे नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आलेले होते. नुकतेच पशुसंवर्धन विभागाला या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यानुसार या ठिकाणाचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com