Fascinating Animal Behavior
Esakal
श्रीकांत वानखडे
प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमचं आमचं सेम असतं, हे वाक्य तुम्ही आतापर्यंत मानवी प्रेमाच्या बाबतीत ऐकलं असेल पण हे वाक्य प्राणी व पक्ष्यांच्या प्रेमाच्या दुनियेत सुद्धा घडतात. ब्रम्हपुरीच्या T1 या वाघाने चक्क त्याच्या जोडीदाराच्या शोधात चार राज्यात दोन हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचे त्याचे लोकेशनवरून कळले. प्राण्यांप्रमाणे पक्षी सुद्धा आपल्या प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी विविधांगी क्ल्युप्त्या करत असल्याचे नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे जीवशास्त्रज्ञ दर्शन दुधाने यांनी पक्षी सप्ताहाच्या अनुषंगाने सांगितले.