तलवारीने केक कापून साजरा केला वाढदिवस, मग...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

अश्विन राजेश उके, आकाश राजेश उके, सतीश पाटील हातात तलवार घेऊन मोपेड गाडीच्या सीटवर दोन बर्थडे केक कापताना दिसून आले.

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू संचारबंदीदरम्यान स्थानिक राहुलनगर बिच्छू टेकडी येथे सोमवारी (ता. 25) वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या युवकांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

यंकय्यापुरा येथील राजेश रामदास वानखडे या सामाजिक कार्यकर्त्याच्या भ्रमणध्वनीवर त्यांच्या मित्राने व्हॉट्‌स ऍपद्वारे फोटो पाठविला. त्यामध्ये अश्विन राजेश उके, आकाश राजेश उके, सतीश पाटील हातात तलवार घेऊन मोपेड गाडीच्या सीटवर दोन बर्थडे केक कापताना दिसून आले.
 

1962 नंतर त्यांनी पुन्हा केले आक्रमण, पण काढावा लागला पळ...

रितेश गवई याने याचे दृश्‍य कॅमेराबद्ध करून ते समाजमाध्यमावर व्हायरल केले. संबंधित व्यक्ती तोंडाला मास्क न बांधता त्यांनी कोरोना पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे राजेश वानखडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अश्विन उके, आकाश उके, सतीश पाटील, रितेश गवई आणि त्यांच्या अन्य दोन ते तीन साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday cake cut with curved sword in Curfew

टॅग्स
टॉपिकस