Amit Shah : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पुत्र मोहामुळे फुटले; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दावा

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या दीड वर्षांपासून जे काही सुरू आहे, त्याकरिता भारतीय जनता पक्षाला दोष दिला जात आहे. परंतु, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस का फुटले? याचे खरे कारण मी आज सांगत आहे.
Amit Shah
Amit ShahSakal

साकोली : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या दीड वर्षांपासून जे काही सुरू आहे, त्याकरिता भारतीय जनता पक्षाला दोष दिला जात आहे. परंतु, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस का फुटले? याचे खरे कारण मी आज सांगत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पुत्र मोहामुळे शिवसेना फुटली तर, शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटला आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. येथील करंजेकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या पटांगणावर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजप तसेच महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आज रविवारी आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार विजय रहांगडाले, राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, नरेंद्र भोंडेकर राजकुमार बडोले,

माजी आमदार गोपाल अग्रवाल, परिणय फुके, नाना पंचबुद्धे, राजेंद्र जैन, प्रकाश बाळबुद्धे, डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, रेखा भाजीपाले, बाळा काशिवार, अमोल हलमारे,नितीन खेडिकर तसेच भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पुढील ५ वर्षात मोफत रेशन, तीन कोटी गरीबांना घरे देण्यात येणार आहेत. दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समृद्ध केले आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर कधीही राज्यघटना आणि आरक्षण बदलणार नाही.

पूर्ण बहुमत असताना आरक्षणाला दहा वर्षांत कधीच धक्का लावला नाही. आम्ही जनतेने दिलेल्या बहुमताचा उपयोग काश्मीर मध्ये कलम ३७० रद्द करण्यासाठी वापरले. तसेच अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी वापरला असे श्री. शाह यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने दहा वर्षांत महाराष्ट्राला काय दिले ? असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० वर्षे काँग्रेसने खोदलेला खड्डा बुजवण्यातच गेली आहेत. पुढच्या पाच वर्षात भारताला महान बनवण्याचे काम होणार आहे. मोदींनी देशाच्या समोर एक संकल्प ठेवला आहे. २०४७ मध्ये या महान भारताची रचना करण्यात येणार आहे, असेही अमित शाह म्हणाले.

भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर संपूर्ण देशात समान नागरिक कायदा लागू करणार, संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. प्रत्येक वृद्ध जो ७० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत, त्यांचा पाच लाखांपर्यंतचा खर्च मोदी सरकार उचलणार आहे, असे घोषणापत्रात जाहीर केले असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

उमेदवार मेंढे यांचाही वाढदिवस

या सभेच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचवेळी माजी आमदार बाळा काशिवार यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचाही आज वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी सुनील मेंढे यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच अमित शहा यांनी उपस्थितांना सुनील मेंढे यांना मते देऊन वाढदिवसाची गिफ्ट देण्याचे आवाहन केले.

ही देशाची निवडणूक आहे : फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मार्गदर्शन करताना ही देशाची निवडणूक आहे. तुम्ही सुनील मेंढे यांना दिलेले मत पंतप्रधान मोदी यांनाच मिळणार असून ते पुढील पाच वर्षांपर्यंत देशाचा आणखी विकास करू शकतील. त्यामुळे आपली मते भाजपच्या उमेदवाराला द्या. त्यामुळे आदिवासी, गरीब, शेतकरी, युवक अशा सर्वांच्या जीवनात परिवर्तन आणता येईल, असेही ते म्हणाले.

प्रत्येक वेळी राहुल बाबा...

गृहमंत्री अमित शहा यांनी या सभेत भाषण देताना काँग्रेसचा जाहीरनामा व अन्य विषयांवर राहुल गांधी यांचा उल्लेख राहुल बाबा असा केला. यावेळी त्यांनी सर्वांच्या घरापर्यंत पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस, समान नागरिक कायदा लागू करणे, तीन कोटी नवीन घरे बांधणे आणि तीन लाख लखपती दिदी तयार करण्याचे आश्‍वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com