अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे विजयी; काँग्रेसचा दारुण पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

भाजपचे या विजयामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या निवडणुकीत 489 पैकी 488 मतदारांनी मतदान केले होते. यातील 475 मते वैध, 10 अवैध तर 3 मते नोटा होती. यातील प्रवीण पोटे यांना 458 मते मिळाली तर काँग्रेसचे अनिल मधोगढीया यांना केवळ 17 मते प्राप्त झालीत. यामुळे प्रवीण पोटे सुमारे 441 मतांनी विजयी झाले.

अमरावती : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी कॉंग्रेच्या उमेदवार या 441 मतांनी पराभूत करून विजय मिळविला.

भाजपचे या विजयामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या निवडणुकीत 489 पैकी 488 मतदारांनी मतदान केले होते. यातील 475 मते वैध, 10 अवैध तर 3 मते नोटा होती. यातील प्रवीण पोटे यांना 458 मते मिळाली तर काँग्रेसचे अनिल मधोगढीया यांना केवळ 17 मते प्राप्त झालीत. यामुळे प्रवीण पोटे सुमारे 441 मतांनी विजयी झाले.

या मतदार संघात भाजपचे 199, सेना 28, युवा स्वाभिमान 23, प्रहार 23,अपक्ष 31, रिपाइं 6, काँग्रेस  128, राष्ट्रवादी 29, एमआयएम 11, बसपा 6 मतदार सदस्य आहेत. भाजपला सेना, युवा स्वाभिमान, प्रहार यांनी सुरुवातीपासून समर्थन दिले होते. काँग्रेसच्या अनिल मधोगढीया यांना राष्ट्रवादी, रिपाई ने समर्थन दिले होते. प्रत्यक्षात आज मतमोजणी नंतर मधोगढीया यांना केवळ 17 मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांना देखील मोठे खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: BJP candidate Pravin Pote wins in Amravatio legislative council election